मराठी बातम्या /बातम्या /मनी /

मोठा दिलासा! कुटुंबातील सदस्याला कोरोनाची लागण झाली तर 15 दिवसांसाठी 'Special Leave'

मोठा दिलासा! कुटुंबातील सदस्याला कोरोनाची लागण झाली तर 15 दिवसांसाठी 'Special Leave'

या कर्मचाऱ्यांना त्यांचे आई-वडील वा कुटुंबातील कोणत्याही Dependant सदस्याला Covid-19 चा संसर्ग झाला तर 15 दिवसांची स्पेशल सुट्टी  (SCL) मिळणार आहे.

या कर्मचाऱ्यांना त्यांचे आई-वडील वा कुटुंबातील कोणत्याही Dependant सदस्याला Covid-19 चा संसर्ग झाला तर 15 दिवसांची स्पेशल सुट्टी (SCL) मिळणार आहे.

या कर्मचाऱ्यांना त्यांचे आई-वडील वा कुटुंबातील कोणत्याही Dependant सदस्याला Covid-19 चा संसर्ग झाला तर 15 दिवसांची स्पेशल सुट्टी (SCL) मिळणार आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 9 जून : केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचे आई-वडील वा कुटुंबातील कोणत्याही Dependant सदस्याला Covid-19 चा संसर्ग झाला तर 15 दिवसांची स्पेशल सुट्टी  (SCL) मिळणार आहे. कार्मिक मंत्रालयाद्वारा (Personnel Ministry) याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत.

ACL संपल्यानंतर सुट्टी घेऊ शकता

जर ACL संपली म्हणजेच 15 दिवसांनंतर कुटुंबातील कोणत्याही सदस्याला संसर्ग असेल किंवा रुग्णालयात दाखल असेल तर सरकारी कर्मचाऱ्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेपर्यंत सुट्टी वाढवली जाऊ शकते. तर दुसऱ्या एका निर्णयात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून प्रभावित भारत सरकारच्या विविध मंत्रालयामध्ये काम करणारे कॉन्ट्रेक्चुअल कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय 1 एप्रिल ते 30 जून 2021 पर्यंत संपूर्ण सॅलरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे (Lockdown) contractual employees ना घरात राहावं लागलं होतं. केंद्र सरकारच्या आदेशानुसार अशा सर्व काॅट्रेक्चुअल कर्मचारी जे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान घरात होते, त्यांना 'ऑन ड्यूटी' मानलं जाईल. सर्व मंत्रालयांना केंद्र सरकारकडून याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत.

हे ही वाचा-APY Scheme: दररोज 7 रुपयांच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला होईल 5 हजारांची सेव्हिंग

संसर्ग झालेल्या कर्मचाऱ्यांना 20 दिवसांची सुट्टी

मंत्रालयाकडून कोविड महासाथीदरम्यान उपचार सुरू असलेले, रुग्णालयात भरती, आयसोलेशन आदीबाबत विस्तृत आदेश जारी करण्यात आले आहे. आदेशमध्ये दिलं आहे की, ‘सरकारी कर्मचाऱ्यांच्या समोर येणाऱ्या अडचणी लक्षात घेण्यात आली आहे. त्यामुळे आदेशमध्ये दिलं आहे की, जर कोणी सरकारी कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण होते, आणि तो घरात आयसोलेशनमध्ये किंवा इतर ठिकाणी क्वारंटाइनमध्ये असतील तर त्यांना 20 दिवसांपर्यंत सुट्टी दिली जाऊ शकते.

20 दिवसांपासून जास्त सुट्टी हवी असेल तरी टेन्शन नाही

केंद्र सरकारने सर्व मंत्रालयांसाठी जारी केलेल्या या आदेशमध्ये म्हटले आहे की, जर कोविड संसर्ग झालेल्या व्यक्तीला 20 दिवसांनंतरही रुग्णालयात राहावे लाहत असेल तर कायदपत्रं पाहून त्याला सुट्टी मिळेल. या आदेशानुसार जर सरकारी कर्मचाऱ्याचे आई-बाबा किंवा कोणी आश्रित कुटुंबातील सदस्य किंवा कोरोनाची लागण झालेलं असल्याचं दिसलं तर त्याला 15 दिवसांची SCL मिळेल.

 

First published:

Tags: Corona patient, Corona vaccine, Employment, Government employees