मराठी बातम्या /बातम्या /मनी /स्पेशल FD स्कीम लवकरच संपणार! या चार बँका देतायंत विशेष ऑफर, मिळेल अतिरिक्त व्याज

स्पेशल FD स्कीम लवकरच संपणार! या चार बँका देतायंत विशेष ऑफर, मिळेल अतिरिक्त व्याज

कोरोना काळात (Coronavirus Pandemic) अनेक बँकांनी एफडीवरील व्याजदर कमी केला होता. दरम्यान काही बँका एफडीवर चांगलं व्याज देतात ज्यातून चांगला नफा मिळवता येतो. या कोरोना काळातही  काही बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी खास एफडी स्कीम सुरू केल्या आहेत

कोरोना काळात (Coronavirus Pandemic) अनेक बँकांनी एफडीवरील व्याजदर कमी केला होता. दरम्यान काही बँका एफडीवर चांगलं व्याज देतात ज्यातून चांगला नफा मिळवता येतो. या कोरोना काळातही काही बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी खास एफडी स्कीम सुरू केल्या आहेत

कोरोना काळात (Coronavirus Pandemic) अनेक बँकांनी एफडीवरील व्याजदर कमी केला होता. दरम्यान काही बँका एफडीवर चांगलं व्याज देतात ज्यातून चांगला नफा मिळवता येतो. या कोरोना काळातही काही बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी खास एफडी स्कीम सुरू केल्या आहेत

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 09 जून: सध्याच्या काळात गुंतवणुकीचे (Investment) विविध पर्याय समोर आले आहेत. मात्र काही गुंतवणुकीचे पर्याय असे आहेत की जे अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. यापैकी एक पर्याय म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit). आजही एक सुरक्षित पर्याय म्हणून बँक-पोस्ट ऑफिसमध्ये एफडी (FD in Bank and Post Office) केली जाते.

कोरोना काळात (Coronavirus Pandemic) अनेक बँकांनी एफडीवरील व्याजदर कमी केला होता. दरम्यान काही बँका एफडीवर चांगलं व्याज देतात ज्यातून चांगला नफा मिळवता येतो. या कोरोना काळातही  काही बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी खास एफडी स्कीम सुरू केल्या आहेत मात्र हा एफडी स्कीम 30 जून रोजी संपत आहेत. SBI, HDFC बँक, ICICI बँक आणि बँक ऑफ बडोदाने सीनिअर सिटीझन्ससाठी या स्कीम सुरू केल्या आहेत. इतर लोकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना या स्कीममध्ये अधिक व्याज मिळते आहे.

हे वाचा-RBI ने बँक ऑफ इंडियाला ठोठावला 4 कोटींचा दंड, BOI चे शेअर्स 4 टक्क्यांनी घसरले

काय आहेत या एफडी स्कीम?

HDFC बँक सीनिअर सिटीझन केअर एफडी- एचडीएफसी बँक सीनिअर सिटीझन्ससाठी सीनिअर केअर एफडी नावाने योजना सुरू केली आहे. या एफडीवर बँक 0.25 टक्के अतिरिक्त प्रीमियम ऑफर करत आहे. ज्येष्ठ नागरिकांना जे 0.50 टक्के अतिरिक्त व्याज मिळते त्याशिवाय अधिक 0.25 टक्के व्याज मिळेल. ही स्कीम पाच वर्ष ते दहा वर्षासाठी आहे. एचडीएफसी बँक ज्येष्ठ नागरिकांना 6.25 टक्के दराने व्याज मिळते.

SBI WECARE- एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांसाठी गेल्यावर्षी मे महिन्यात एसबीआय वीकेअर ही टर्म डिपॉझिट स्कीम घोषित केली होती. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी 0.80 टक्के अतिरिक्त व्याज मिळेल. सध्या पाच वर्षांसाठी 5.40 टक्के व्याज मिळते आहे, मात्र या स्कीमअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षांसाठी 6.20 टक्के दराने व्याज मिळेल.

हे वाचा-'कर्जापेक्षा जास्त माझी संपत्ती ED ने जप्त केलीय; तरी माझं नाव घोटाळेबाज का?'

ICICI बँक गोल्डन इयर्स एफडी स्कीम- या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त मिळणाऱ्या 0.50 टक्के व्याजाव्यतिरिक्त आणखी 0.30 टक्के व्याज मिळेल. अर्थात सामान्य नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.80 टक्के व्याज मिळेल. ही योजना पाच वर्ष 1 दिवस ते 10 वर्षांसाठी 2 कोटी रुपयांपर्यंतच्या  रकमेवर लागू होईल

बँक ऑफ बडोदा- या बँकेने देखील ज्येष्ठ नागरिकांसाठी खास स्कीम आणली आहे. पाच वर्षांपेक्षा जास्त ते दहा वर्षांसाठी असणाऱ्या एफडीवर BOB ज्येष्ठ नागरिकांना एक टक्का अधिक व्याज देते आहे. या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 6.25 या दराने व्याज दिले जात आहे.

First published:

Tags: Fixed Deposit, Money, Sbi fixed deposit