मराठी बातम्या /बातम्या /मनी /पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांनी 'हे' नंबर सेव्ह करुन ठेवा; बँकिंग संबंधित प्रश्न घरबसल्या सुटतील

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांनी 'हे' नंबर सेव्ह करुन ठेवा; बँकिंग संबंधित प्रश्न घरबसल्या सुटतील

पंजाब नॅशनल बँकेने (PNB) काही विशेष क्रमांक जारी केले आहेत, ज्यावर कॉल करून तुम्ही तुमच्या सर्व समस्या सोडवू शकता. पीएनबीने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे.

पंजाब नॅशनल बँकेने (PNB) काही विशेष क्रमांक जारी केले आहेत, ज्यावर कॉल करून तुम्ही तुमच्या सर्व समस्या सोडवू शकता. पीएनबीने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे.

पंजाब नॅशनल बँकेने (PNB) काही विशेष क्रमांक जारी केले आहेत, ज्यावर कॉल करून तुम्ही तुमच्या सर्व समस्या सोडवू शकता. पीएनबीने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे.

मुंबई, 4 मे : पंजाब नॅशनल बँकेत (PNB) खाते असलेल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुमचेही या सरकारी बँकेत खाते असेल, तर आता तुम्हाला बँकिंगशी संबंधित कोणत्याही समस्येची काळजी करण्याची गरज नाही. बँकेने काही विशेष क्रमांक जारी केले आहेत, ज्यावर कॉल करून तुम्ही तुमच्या सर्व समस्या सोडवू शकता. पीएनबीने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे.

बँकेचे ग्राहक कस्टमर केअर टोल फ्री क्रमांकावर (PNB Toll Free Number) संपर्क करून सर्व समस्या सोडवू शकतात. ग्रीन पिन म्हणजे काय? NRI खाते कसे उघडायचे? माझ्या खात्यातील शिल्लक किती आहे? याशिवाय, मी खाते कसे फ्रीज करु शकतो? अशा सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तरे मिळतील.

पीएनबीने ट्वीट केले

पंजाब नॅशनल बँकेने आपल्या अधिकृत ट्वीटमध्ये लिहिले आहे की, "काय, कधी आणि कसे? तुमच्या बँकेशी संबंधित सर्व समस्या काही मिनिटांत सोडवल्या जातील. तुम्हाला फक्त आम्हाला कॉल करायचा आहे."

Petrol Diesel Prices: तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी चैक करा किमती

कोणत्या सुविधा मिळतील?

अकाऊंट बॅलेन्स, शेवटचे 5 व्यवहार, डेबिट कार्ड जारी करा/ब्लॉक करा, पिन तयार करा, ग्रीन पिन बदला, चेक बुक स्टेटस तपासा, डेबिट कार्ड व्यवहार मर्यादा अपडेट करा, ई-स्टेटमेंटची नोंदणी करा, UPI ब्लॉक करा, चेकने पेमेंट रद्द करा, खाते फ्रीज अशा सुविधा मिळतील.

New IPO : गुंतवणूकदारांना कमाईच्या अनेक संधी, लवकरच 9 कंपन्यांचे आयपीओ येणार

टोल फ्री नंबर

या सर्व समस्यांसाठी तुम्ही 1800-103-2222, 1800-180-2222, 0120-249-0000 या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधू शकता. या सर्व क्रमांकांवर तुम्ही तुमच्या बँकिंगशी संबंधित सर्व समस्या सोडवू शकता. तुम्ही हे नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा.

तुम्ही अधिकृत लिंक तपासू शकता

याशिवाय अधिक माहितीसाठी, तुम्ही https://tinyurl.com/54dyhmaf या अधिकृत लिंकला भेट देऊ शकता.

First published:

Tags: Bank services, Money, Pnb bank