मराठी बातम्या /बातम्या /मनी /खूशखबर! दिवाळीआधी खरेदी स्वस्त सोने, मोदी सरकार देत आहे सुवर्णसंधी

खूशखबर! दिवाळीआधी खरेदी स्वस्त सोने, मोदी सरकार देत आहे सुवर्णसंधी

Sovereign Gold Bond Scheme: सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीमअंतर्गत पुन्हा एकदा ग्राहकांना स्वस्त सोने खरेदीची संधी मिळणार आहे. सरकारकडून 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान सॉव्हरेन गोल्ड बाँडसाठीचे सब्सक्रिप्शन जारी केले जाणार आहे.

Sovereign Gold Bond Scheme: सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीमअंतर्गत पुन्हा एकदा ग्राहकांना स्वस्त सोने खरेदीची संधी मिळणार आहे. सरकारकडून 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान सॉव्हरेन गोल्ड बाँडसाठीचे सब्सक्रिप्शन जारी केले जाणार आहे.

Sovereign Gold Bond Scheme: सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीमअंतर्गत पुन्हा एकदा ग्राहकांना स्वस्त सोने खरेदीची संधी मिळणार आहे. सरकारकडून 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान सॉव्हरेन गोल्ड बाँडसाठीचे सब्सक्रिप्शन जारी केले जाणार आहे.

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : सरकारकडून पुन्हा एकदा स्वस्त सोने खरेदीची सुवर्णसंधी तुम्हाला मिळणार आहे. सरकारकडून सॉव्हरेन गोल्ड बाँडची (Sovereign Gold Bond Scheme) सातवी सीरिज जारी केली जाणार आहे.  सरकारकडून 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान सॉव्हरेन गोल्ड बाँडसाठीचे सब्सक्रिप्शन जारी केले जाणार आहे. या गोल्ड बाँडची सेटलमेंट तारीख 20 ऑक्टोबर आहे. रिझर्व्ह बँकेच्या संमतीने जे गुंतवणूकदार याकरचा सब्सक्राइब करतील, त्यांनी ऑनलाइन पेमेंट केल्यास प्रति ग्राम 50 रुपयांची सूट देखील मिळेल.

काय असेल किंमत?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एका निवेदनात असे म्हटले आहे की, या गोल्ड बाँडची किंमत प्रति ग्रॅम 5,051 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांसाठी 50 रुपये सूट वजा करता ही किंमत प्रति ग्रॅम 5001 रुपये असेल. याआधी इशू करण्यात आलेल्या सहाव्या सीरिजमधील गोल्ड बाँडची किंमत 5117 रुपये प्रति ग्रॅम होती. हे सब्सक्रिप्शन 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत खुले करण्यात आले होते. सरकारकडून आरबीआयच्या माध्यमातून हे गोल्ड बाँड जारी केले जातात.

वाचा काय आहे स्कीम

गोल्ड बाँडमध्ये गुंतवणुकदारांना सोने फिजिकल स्वरूपात मिळत नाही, मात्र फिजिकल गोल्डपेक्षा ही गुंतवणूक सुरक्षित मानली जाते.  सरकारकडून आरबीआयच्या माध्यमातून हे गोल्ड बाँड जारी केले जातात. या योजनेचा मुख्य उद्देश सोन्याची फिजिकल मागणी कमी करणे हा आहे, जेणेकरून सोन्याची आयात कमी केली जाईल. 2015 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती.

(हे वाचा-Gold Price: या कारणामुळे वाढल्या सोन्याच्या किंमती, इथे वाचा प्रति तोळाचे नवे दर)

आरबीआयने अशी माहिती दिली आहे की, भारत बुलियन अँड असोसिएशन लिमिटेडकडून गोल्ड बाँड जारी करण्याच्या आधीच्या आठवड्यातील शेवटच्या 3 व्यवहाराच्या दिवसात 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीच्या आधारे या बाँडच्या किंमती ठरतात. Sovereign Gold Bond ची विक्री बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून होते. यातील कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही बाँड योजनेमध्ये सामील होऊ शकता.

कोण करू शकतो गुंतवणूक?

सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये ती प्रत्येक व्यक्ती गुंतवणूक करू शकते जी भारतात वास्तव्य करते. तुम्ही तुमच्यासाठी किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबरोबर संयुक्त पद्धतीने याची खरेदी करू शकता. अल्पवलीन मुलांच्या नावे देखील गोल्ड बाँड खरेदी केले जाऊ शकतात. यात एक विद्यापीठ, धर्मादाय संस्था किंवा ट्रस्ट बॉन्ड धारक असू शकतो.

First published:

Tags: Gold, Gold and silver prices today