अलर्ट! स्वस्त सोनेखरेदीची आज शेवटची संधी, असा घ्या मोदी सरकारच्या योजनेचा फायदा

अलर्ट! स्वस्त सोनेखरेदीची आज शेवटची संधी, असा घ्या मोदी सरकारच्या योजनेचा फायदा

सरकारद्वारे सॉव्हरेन गोल्ड बाँडचे सब्सक्रिप्शन 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरदरम्यान लागू करण्यात येत आहे. हे बाँड 8 सप्टेंबर रोजी इश्यू करण्यात येतील.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : मोदी सरकारकडून पुन्हा एकदा स्वस्त सोनेखरेदी करण्याची सुवर्णसंधी (Buy Gold with Modi Govt scheme) मिळणार आहे. यावर्षीची ही शेवटची संधी असेल. सरकारद्वारे सॉव्हरेन गोल्ड बाँडचे सब्सक्रिप्शन 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरदरम्यान लागू करण्यात येत आहे. हे बाँड 8 सप्टेंबर रोजी इश्यू करण्यात येतील. गोल्ड बाँडमध्ये गुंतवणुकदारांना सोने फिजिकल स्वरूपात मिळत नाही, मात्र फिजिकल गोल्डपेक्षा ही गुंकवणूक सुरक्षित मानली जाते.

आरबीआय भारत सरकारतर्फे हे बाँड जारी करत आहे. 2015 मध्ये सॉव्हरेन गोल्ड बाँडची योजना सुरू करण्यात आली होती. भारत बुलियन अँड असोसिएशन लिमिटेडकडून गोल्ड बाँड जारी करण्याच्या आधीच्या आठवड्यातील शेवटच्या 3 व्यवहाराच्या दिवसात 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीच्या आधारे या बाँडच्या किंमती ठरतात.

वाचा-सोन्यावर मिळतोय गेल्या 5 महिन्यांमधील सर्वाधिक डिस्काऊंट, तुम्हालाही आहे संधी

अशी करा गुंतवणूक

यामध्ये गुंतवणूक करताना तुम्ही एका आर्थिक वर्षामध्ये 500 ग्रॅम सोन्याचे बाँड खरेदी करू शकता. कमीतकमी गुंतवणूक 1 ग्रॅमची आहे. 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान सॉव्हरेन गोल्ड बाँडचे सब्सक्रिप्शन खरेदी करता येणार आहे. गोल्ड ईटीएफच्या तुलनेत या योजनेत कोणतेही वार्षिक शुल्क द्यावे लागत नाही. या बाँडच्या आधारे तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता. हे बाँड पेपर आणि इलेक्ट्रॉनिक फॉरमॅटमध्ये असतात. त्यामुळे त्यांना फिजिकल गोल्ड प्रमाणे लॉकरमध्ये ठेवण्यासाठी खर्च देखील करावा लागत नाही. आरबीआयने एप्रिलमध्ये घोषणा केली होती सरकारकडून सप्टेंबरपर्यंत एकूण सहा टप्प्यांमध्ये गोल्ड बाँड जारी करण्यात येणार आहेत

वाचा-Bank Fixed Deposit: या आहेत टॉप 4 बँक एफडी, वाचा कुठे मिळेल बंपर रिटर्न

ही आहेत गुंतवणुकीचे वैशिष्ट्य

या गुंतवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, सोन्याचे भाव वाढल्यानंतर लाभ मिळतोच पण त्याचबरोबर गोल्ड बाँडवर गुंतवणूक करणाऱ्यांना वार्षिक 2.5 दराने व्याज मिळेल. या बाँडवर मिळणाऱ्या व्याजाला सब्सक्राइबर्स च्या उत्पन्नात जोडले जाईल, त्यावर त्याला टॅक्स द्यावा लागेल. गोल्ड बाँडचा मॅच्यूरिटी पीरिअड 8 वर्षांचा असतो, पण गुंतवणूकदाराकडे पर्याय असतो की त्याला 5 वर्षात हे काढू शकतात. 5 वर्षांनी पैसे काढल्यानंतर कॅपिटल गेन टॅक्स देखील लावला जात नाही. गोल्ड बाँडवर 3 वर्षानंतर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागेल (मॅच्यूरिटीपर्यंत ठेवल्यास कॅपिटल गेन टॅक्स लागणार नाही). त्याचप्रमाणे कर्जासाठी देखील याचा वापर करता येईल

Published by: Priyanka Gawde
First published: August 31, 2020, 9:42 AM IST

ताज्या बातम्या