Home /News /money /

आजपासून इथे मिळेल स्वस्तात सोनं खरेदीची संधी; जाणून घ्या काय आहे किंमत

आजपासून इथे मिळेल स्वस्तात सोनं खरेदीची संधी; जाणून घ्या काय आहे किंमत

गुंतवणूकदार एक ग्रॅमच्या मल्टीप्लायमध्ये गुंतवणूक करू शकतात. यात गुंतवणूकीचा अवधी 8 वर्ष आहे. पाचव्या वर्षापासून योजनेतून बाहेर पडण्याचा पर्याय मिळतो.

    नवी दिल्ली, 28 डिसेंबर : केंद्र सरकार पुन्हा एकदा स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी देत आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign Gold Bond) 28 डिसेंबर रोजी जारी होणार आहे. यात स्वस्त दरात सोनं खरेदी करून आपली गुंतवणूक वाढवू शकता. 2020-21 च्या (Gold Bond scheme) 9व्या सीरिजसाठी 5000 रुपये प्रति ग्रॅम आहे. यात 28 डिसेंबर ते 1 जानेवारी 2021 पर्यंत गुंतवणूक करू शकता. ऑनलाईन खरेदीवर मिळेल डिस्काउंट - सॉवरेन गोल्ड बॉन्डसाठी ऑनलाईन अर्ज केल्यास, यात प्रति ग्रॅम 50 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये इश्यू प्राईसवर दरवर्षी 2.50 टक्के निश्चित व्याज मिळतं. व्याजाचे पैसे प्रत्येक सहा महिन्यांनी तुमच्या खात्यात ट्रान्सफर होतात. मॅच्युरिटी पिरियड - सॉवरेन गोल्ड बॉन्डचा मॅच्युरिटी पीरियड 8 वर्षांचा असतो. परंतु गुंतवणूकदार याला 5 वर्षात ब्रेकही करू शकतात. RBI - रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया भारत सरकारकडून सॉवरेन गोल्ड बॉन्ड 2020-21 जारी करते. बॉन्डमध्ये गुंतवणूकदार एक ग्रॅमच्या मल्टीप्लायमध्ये गुंतवणूक करू शकतात. यात गुंतवणूकीचा अवधी 8 वर्ष आहे. पाचव्या वर्षापासून योजनेतून बाहेर पडण्याचा पर्याय मिळतो. बॉन्डची विक्री व्यक्तिगतरित्या, भारताचे रहिवासी (Indian Citizens), हिंदू अविभाजित परिवार (HUF), ट्रस्ट्स, विद्यापिठ आणि संस्थांना दान केली जाईल. या स्किमअंतर्गत व्यक्तिगत गुंतवणूकदार आणि हिंदू अविभाजित कुटुंब एका आर्थिक वर्षात कमीत कमी एक ग्रॅम आणि अधिकाधिक चार किलोग्रॅम गोल्डसाठी गुंतवणूक करू शकतात. ट्रस्ट्ससारख्या संस्था दरवर्षी 20 किलोग्रॅम सोन्यात गुंतवणूक करू शकतात. गोल्ड बॉन्डची विक्री बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्रात्प शेयर बाजारांद्वारे केली जाते. कोण करू शकतं गुंतवणूक - सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये तोच व्यक्ती गुंतवणूक करू शकतो, जो भारताचा रहिवासी आहे. तसंच तो स्वत:साठी, एखाद्या दुसऱ्या व्यक्तीसोबत संयुक्तरित्या किंवा अल्पवयीनकडूनही गोल्ड बॉन्ड खरेदी करता येतो.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold

    पुढील बातम्या