मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Home Loan Tips : होमलोन सहज मिळवण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, फायदा होईल

Home Loan Tips : होमलोन सहज मिळवण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, फायदा होईल

गृहकर्जासाठी अर्ज करताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. अनेक कारणांमुळे बँका गृहकर्ज देण्यास नकार देतात. आज गृहकर्जाबाबत काही माहिती घेऊया ज्यामुळे सहजपणे गृहकर्ज घेता येऊ शकते.

गृहकर्जासाठी अर्ज करताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. अनेक कारणांमुळे बँका गृहकर्ज देण्यास नकार देतात. आज गृहकर्जाबाबत काही माहिती घेऊया ज्यामुळे सहजपणे गृहकर्ज घेता येऊ शकते.

गृहकर्जासाठी अर्ज करताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. अनेक कारणांमुळे बँका गृहकर्ज देण्यास नकार देतात. आज गृहकर्जाबाबत काही माहिती घेऊया ज्यामुळे सहजपणे गृहकर्ज घेता येऊ शकते.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 21 नोव्हेंबर : स्वतःचे घर खरेदी (Home Buying tips) करण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. घर घेण्यासाठी पुरेसे पैसे नसतील तर गृहकर्जाच्या (Home Loan) मदतीने घराचे स्वप्न पूर्ण करता येते. बँका किंवा बिगर बँकिंग फायनान्स कंपन्या (Non-banking finance companies) दीर्घकालीन कर्ज देतात. त्या बदल्यात तुम्हाला ठराविक कालावधीसाठी बँक किंवा NBFC ला मासिक हप्त्यांच्या स्वरूपात एक निश्चित रक्कम भरावी लागते, ज्यामध्ये तुम्ही कर्जाची मूळ रक्कम आणि व्याजाची परतफेड करता. गृहकर्जासाठी अर्ज करताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. अनेक कारणांमुळे बँका गृहकर्ज देण्यास नकार देतात. आज गृहकर्जाबाबत काही माहिती घेऊया ज्यामुळे सहजपणे गृहकर्ज घेता येऊ शकते.

लोन ऑफरची माहिती ठेवा (Loan Offers)

>> बँकांकडून वेळोवेळी मिळणाऱ्या कर्ज ऑफरची संपूर्ण माहिती ठेवा.

>> घाईत कर्ज घेऊ नका. प्रथम विविध बँकांच्या कर्ज योजनांची माहिती घ्या, त्यांची तुलना करा आणि मग अर्ज करा.

CIBIL स्कोरवर लक्ष ठेवा

>> CIBIL स्कोर तुमची क्रेडिट हिस्ट्री दाखवतो. तुम्हाला कर्ज मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.

>> याद्वारे बँका तुम्ही यापूर्वी कर्ज घेतले आहे की नाही किंवा तुम्ही क्रेडिट कार्ड कसे वापरले इत्यादी पाहिले जाते.

>> क्रेडिट स्कोअर रिपेमेंट हिस्ट्री, क्रेडिट युटिलायझेशन रेशो, सध्याची कर्जे आणि बिलांचे वेळेवर पेमेंट याद्वारे दिसून येते.

>> क्रेडिट स्कोअर 300-900 च्या रेंजमध्ये आहे. 750 किंवा त्याहून अधिक गुण चांगले मानले जातात.

>> तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला बनवणे महत्त्वाचे आहे. यासाठी कर्ज किंवा इतर कोणत्याही ईएमआय आणि क्रेडिट कार्डची थकबाकी निर्धारित वेळेपूर्वी भरण्याची सवय लावा.

>> तुमचा क्रेडिट स्कोअर नियमितपणे तपासा जेणेकरून तुम्ही तो वेळेत सुधारू शकाल.

>> तुमचा कर्ज परतफेडीचा रेकॉर्ड चांगला असेल तर तुमचा CIBIL स्कोअरही तितकाच चांगला असेल हे समजून घ्या.

>> एकावेळी एकापेक्षा जास्त कर्ज घेऊ नका कारण त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिटवर दिसत आहे.

जोडीदाराच्या निवृत्तिवेतनासाठी नवे संयुक्त बँक खाते अनिवार्य नाही

संयुक्त गृहकर्जासाठी अर्ज करू शकता

>> गृहकर्ज मिळत नसेल तर संयुक्त गृहकर्ज हा चांगला पर्याय आहे.

>> संयुक्त गृहकर्ज घेतल्याने कर्ज देणाऱ्या संस्थेचा धोका कमी होतो.

>> तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला ज्याचं स्थिर उत्पन्न आणि चांगला क्रेडिट स्कोअर असेल त्याला सह-अर्जदार बनवा.

>> सह-अर्जदार जोडल्याने कर्ज मिळण्याची शक्यता वाढते.

>> संयुक्त गृहकर्ज घेतल्यावर, दोन्ही अर्जदार आयकर कपातीचा लाभ घेऊ शकतील.

कमी रकमेसाठी अर्ज करा

>>घर घ्यायचे असेल, तर लोन-टू-व्हॅल्यू (LTV) रेश्यो कमी ठेवा, याचा अर्थ घर खरेदी करण्यासाठी तुमचे योगदान अधिक असेल.

>> यामुळे बँकेचा धोका कमी होतो आणि कर्ज मिळण्याची शक्यता वाढते.

>> कमी LTV गुणोत्तरामुळे कमी ईएमआयमुळे लोन अफोर्डेबिलिटी वाढते.

कोणत्या बँकेत अर्ज करावा

>> तुमचे खाते किंवा एफडी असलेल्या बँकेत तुम्ही कर्जासाठी अर्ज करावा. असे केल्याने कर्ज मिळण्याची शक्यता वाढते.

Paytmची निराशाजनक एन्ट्री, गुंतवणूकदार चिंतेत; वॉरेन बफे यांना कोट्यवधींचा फायदा

फिक्स ऑब्लिगेशन टू इनकम रेश्योवर लक्ष ठेवा (Fixed Obligation to Income Ratio)

>> फिक्स ऑब्लिगेशन टू इनकम रेश्योमुळे (FOIR) तुम्ही दर महिन्याला किती कर्जाचा हप्ता भरू शकता बँकेला कळते.

>> कर्ज देताना बँका नक्कीच FOIR बघतात .

>> तुमचे सध्याचे ईएमआय, घरभाडे, विमा पॉलिसी आणि इतर देयके यापैकी किती टक्के तुमचे सध्याचे उत्पन्न आहे यामुळे कळते.

>> जर बँकेला वाटलं की हे सर्व खर्च तुमच्या पगाराच्या 50 टक्क्यांपर्यंत आहेत तर गृहकर्ज अर्ज नाकारला जाऊ शकतो.

First published:

Tags: Home Loan, बँक