मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 2 दिवस बंद राहणार काही सेवा, हे आहे कारण

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 2 दिवस बंद राहणार काही सेवा, हे आहे कारण

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या काही सेवा 16 डिसेंबर आणि 17 डिसेंबर 2020 रोजी बंद राहणार आहेत. सर्व्हिसेस अंडर मेंटेनन्स अंतर्गत या सेवा बंद ठेवल्या जाणार आहेत.

    नवी दिल्ली, 16 डिसेंबर: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या काही ग्राहकांना 16 आणि 17 डिसेंबर 2020 या दरम्यान काही सेवांचा वापर करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या बँकेतील काही सेवांमध्ये मेंटेनन्सचे काम सुरू असल्याने त्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र बँकेचे असे म्हणणे आहे की, यामुळे सर्व ग्राहकांवर परिणाम होणार नाही. यावेळी केवळ एनआरआय सेवांवर (NRI Services) परिणाम होणार आहे. एसबीआयने ट्वीट करून माहिती दिली आहे की, मेंटेनन्ससाठी मिस्ड कॉल आणि SMS च्या माध्यमातून बँकेच्या एनआरआय सेवा 15 ते 17 डिसेंबर दरम्यान काम करणार नाहीत. दुसऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करण्याचा बँकेचा सल्ला एसबीआयने ट्वीट करून ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे बँकेच्या इतर डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. एसबीआयचे असे म्हणणे आहे की ग्राहकांना एखाद्या अडथळ्याशिवाय बँकिंग अनुभव मिळावा याकरता बँकेच्या सुविधा उत्तम करण्यासाठी मेंटेनन्सची आवश्यकता आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला YONO SBI app ची सुविधा बंद पडली होती. त्यावेळी ग्राहकांना मोठ्या प्रमाणात अडथळ्यांचा सामना करावा लागला होता. बँकेच्या ट्विटर हँडलवर यावेळी ग्राहकांनी विविध तक्रारी देखील केल्या होत्या. बँकेनी सिस्टम आउटेजमुळे मोबाइल अॅपवर परिणाम झाल्याचे त्यावेळी सांगितले होते. (हे वाचा-या व्यवसायात आहे दमदार फायदा, तुम्हाला मिळेल 9 लाखांपर्यंत उत्पन्न) याआधी एसबीआयने 22 नोव्हेंबर रोजी त्यांचा इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्म अपग्रेड केला होता. यावेळी ग्राहकांना इंटरनेट बँकिंग, YONO, YONO lite यासारख्या सुविधा वापरताना काही समस्यांचा सामना करावा लागला होता. ऑक्टोबर महिन्यातही ग्राहकांना अशाच प्रकारे समस्येचा सामना करावा लागला होता. योनो एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडियाचा एक इंटिग्रेटेड डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.  युजर्स या माध्यमातून एसबीआयच्या सर्व बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: SBI

    पुढील बातम्या