...म्हणून सोन्याच्या किंमतीत झाली मोठी वाढ; वाचा 10 ग्रॅमचे नवीन दर

...म्हणून सोन्याच्या किंमतीत झाली मोठी वाढ; वाचा 10 ग्रॅमचे नवीन दर

लॉकडाऊनमध्ये सोन्याच्या किंमतीला मोठे भाव आल्याने अनेकजण सोन्यात गुंतवणूक करीत असल्याचे दिसून येत आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट :आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.  अमेरिकेच्या डॉलरचे मूल्य कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत वाढ होत आहे. तर दुसरीकडे भारतीय बाजारात रुपयांचं मूल्य कमी झालं आहे. ज्यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.

दिल्ली सर्राफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 161 रुपयांनी वाढली आहे. सोबतच या दरम्यान चांदीच्या किंमती 800 रुपये प्रति किलोपर्यंत वाढले आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, भारत आणि चीनदरम्यान तणाव वाढत असल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती मोठी वाढ झाली आहे. भारतात सोन्याच्या किंमती 7 ऑगस्ट रोजी 56,200 रुपयांच्या रेकॉर्ड स्तरावर पोहोचल्या होत्या. मात्र त्यानंतर जागतिक स्तरावर चढ-उतारासह सोन्याच्या किंमती अस्थिर राहिल्या आहेत. ऑगस्टमध्ये देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती 4000 रुपये प्रति ग्रॅमपर्यंत पोहोचल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात 2 आठवड्यात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ

जागतिक स्तरावर पोहोचलेल्या सोन्याच्या किंमतींनी सोमवारी मोठा टप्पा गाठला. डॉलरचे मूल्य कमी झाल्याने सोन्याची मागणी वाढत आहे. आणि अमेरिकेच्या फेडरल रिजर्व्हच्या नव्या नीतीचे संकेत मिळाले आहेत. येत्या दिवसात व्याजाचा दर काही काळासाठी कमी राहिल.

स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी

मोदी सरकारकडून पुन्हा एकदा स्वस्त सोनेखरेदी करण्याची सुवर्णसंधी (Buy Gold with Modi Govt scheme) मिळणार आहे. यावर्षीची ही शेवटची संधी असेल. सरकारद्वारे सॉव्हरेन गोल्ड बाँडचे सब्सक्रिप्शन 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरदरम्यान लागू करण्यात येत आहे. हे बाँड 8 सप्टेंबर रोजी इश्यू करण्यात येतील. गोल्ड बाँडमध्ये गुंतवणुकदारांना सोने फिजिकल स्वरूपात मिळत नाही, मात्र फिजिकल गोल्डपेक्षा ही गुंतवणूक सुरक्षित मानली जाते.

Published by: Meenal Gangurde
First published: August 31, 2020, 5:49 PM IST

ताज्या बातम्या