मराठी बातम्या /बातम्या /मनी /

कमाईची संधी! Snapdeal देखील IPO आणण्याच्या तयारीत, उभारणार 40 कोटी डॉलरचा फंड

कमाईची संधी! Snapdeal देखील IPO आणण्याच्या तयारीत, उभारणार 40 कोटी डॉलरचा फंड

Know Everything about IPO

Know Everything about IPO

ई-कॉमर्स कंपनी स्नॅपडील (Snapdeal) देखील आयपीओ आणण्याच्या (Snapdeal Initial Public Offering) तयारीत आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 04 सप्टेंबर: गेल्या काही महिन्यांमध्ये असंख्य आयपीओ बाजारात आले आहेत. अनेक नवनवीन कंपन्या इनिशिअल पब्लिक ऑफरिंग अर्थात आयपीओ आणत आहेत. ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, ई-कॉमर्स कंपनी स्नॅपडील (Snapdeal) देखील आयपीओ आणण्याच्या (Snapdeal Initial Public Offering) तयारीत आहे. मीडिया अहवालांच्या मते दिग्गज गुंतवणुकदार सॉफ्टबँक कॉर्प (SoftBank Corp) समर्थित स्नॅपडील कंपनी 40 कोटी डॉलर्स एवढा फंड उभारता येईल इतका मोठा आयपीओ (Snapdeal IPO) आणण्याच्या तयारीत आहे.

प्राथमिक टप्प्यात आहे योजना

रिपोर्टमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, ही योजना सध्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आहे. दरम्यान स्नॅपडील किंवा सॉफ्टबँक कॉर्पकडून याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही. सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच हा आयपीओ बाजारात येऊ शकतो.

हे वाचा-स्वत:चं घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी!8 सप्टेंबरला ही बँक विकतेय स्वस्त प्रॉपर्टी

स्नॅपडीलचे मुख्यालय गुरुग्राम याठिकाणी आहे. या कंपनीची स्थापना 2010 साली करण्यात आली होती. या प्लटॅफॉर्मवर सध्या 800 कॅटेगरीजचे (Snapdeal E-commerce Platform) जवळपास 6 कोटी प्रोडक्ट्स रजिस्टर आहे. कंपनी देशभरात सहा हजार पेक्षा जास्त शहरांत डिलिव्हरी सेवा देत आहे.

हे वाचा-1 ऑक्टोबरपासून 12 तास करावं लागणार काम; ओव्हरटाइम-PF मध्ये होणार बदल?

बाजारात आलेत महत्त्वाचे आयपीओ

विजया डायग्नॉस्टिक सेंटर आणि अॅमी ऑर्गेनिक्सचा आयपीओ 1 सप्टेंबर रोजी बाजारात आला आहे. या आयपीओमधून 2465 कोटी रुपयांचा फंड उभा राहिल अशी अपेक्षा आहे. याआधी देवयानी इंटरनॅशनल, नुवोको विस्टास कॉर्पोरेशन आणि कारट्रेड टेकसह 8 कंपन्यांनी गेल्या महिन्यात 18,243 कोटी रुपये जमा करण्यासाठी शेअर्सची विक्री केली होती. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 20 कंपन्यांनी आयपीओ जारी करत 45 हजार कोटी जमा केले आहेत. गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात 2020-21 दरम्यान 30 कंपन्यांनी आयपीओमधून 31,277 कोटींचा फंड उभा केला होता

First published:

Tags: Money