मराठी बातम्या /बातम्या /मनी /स्मार्टफोन्स खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार? सरकारच्या 'या' निर्णयाचा होणार परिणाम

स्मार्टफोन्स खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार? सरकारच्या 'या' निर्णयाचा होणार परिणाम

Smartphones Price Hike: मोबाईल डिस्प्ले असेंबलीचे भाग असलेल्या आयातीवर 15 टक्के कस्टम ड्युटी लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Smartphones Price Hike: मोबाईल डिस्प्ले असेंबलीचे भाग असलेल्या आयातीवर 15 टक्के कस्टम ड्युटी लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Smartphones Price Hike: मोबाईल डिस्प्ले असेंबलीचे भाग असलेल्या आयातीवर 15 टक्के कस्टम ड्युटी लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

मुंबई, 20 ऑगस्ट : येत्या काही दिवसात लवकरच 5G सेवा लॉन्च होणार आहे. तसेच सणासुदीच्या काळात स्मार्टफोन खरेदीही वाढते. मात्र तुम्हीही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वाट न पाहता लवकर खरेदी करा. कारण येत्या काळाता काळात भारतात मोबाईल फोनच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे. सरकारने मोबाईल डिस्प्ले असेंबलीच्या आयातीवर कस्टम ड्युटी वाढवली आहे. देशातील बहुतांश कंपन्या चीनमधून पार्ट्स आयात करून भारतात मोबाईल असेंबल करतात. अशा परिस्थितीत भारतात स्मार्टफोनची किंमत वाढणार आहे. इंडिया टीव्हीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

मोबाईल डिस्प्ले असेंबलीचे भाग असलेल्या आयातीवर 15 टक्के कस्टम ड्युटी लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. CBIC ने म्हटले की स्पीकर आणि सिम ट्रे सारख्या भागांसह येणार्‍या मोबाईल फोन डिस्प्ले असेंबलीच्या आयातीवर केवळ 15 टक्के दराने बेसिक सीमाशुल्क (BCD) लागू होईल.

PM Vaya Vandana Yojana: विवाहित जोडप्यांनो, या सरकारी योजनेत करा गुंतवणूक, दरमहा मिळतील 18500 रुपये

सरकारचे नियम बदलण्यामागचे मुख्य कारण म्हणजे स्क्रीनचे प्रकार. सध्या, मोबाईल डिस्प्ले असेंबली युनिटच्या आयातीवर 10 टक्के दराने सीमा शुल्क आकारले जाते. पण कंपन्या फक्त सिंगल डिस्प्ले आयात करत नाहीत. त्याऐवजी डिस्प्ले असेंबली इंपोर्ट करतात. या असेंबली युनिटला स्क्रीनसोबतच स्पीकर आणि सिम ट्रे देखील जोडण्यात आला आहे. याशिवाय, मोबाईल फोनच्या डिस्प्ले युनिटमध्ये टच पॅनल, कव्हर ग्लास, एलईडी बॅकलाईट आणि एफपीसी सारखे भाग समाविष्ट आहेत. अशा परिस्थितीत, सिम ट्रे आणि स्पीकरसारख्या वैयक्तिक उपकरणांच्या आयातीवर कोणतेही शुल्क नाही.

SBI Rules: एसबीआयच्या व्यवहारासंबंधीचे नियम बदलले? तुमच्यापर्यंत आलाय का 'हा' मेसेज?

कंपन्या माहिती लपवत होत्या?

डिस्प्ले असेंब्लीच्या आयातीत चुकीची माहिती दिल्याच्या घटना घडल्याचे सीबीआयसीने म्हटले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी बीसीडीमध्ये बदल करण्यात आला आहे.

First published:

Tags: Central government, Money, Smartphone, Tax