मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PPF, NSC खातेदाराने दावा न केलेले पैसे कुठे जातात? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

PPF, NSC खातेदाराने दावा न केलेले पैसे कुठे जातात? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

संग्रहित फोटो

संग्रहित फोटो

PPF, NSC, EPF किंवा इतर सरकारी बचत योजनांमधले पैसे क्लेम न केल्यावर सीनिअर सिटिझन्स वेलफेअर फंडामध्ये जमा केले जातात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली - सुरक्षित गुंतवणूक पर्यायांसाठी लोक अनेकदा सरकारी योजनांमध्ये गुंतवणुकीवर भर देतात. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आणि सीनिअर सिटिझन्स सेव्हिंग स्कीम अशाच काही योजना आहेत ज्या खूप लोकप्रिय आहेत. या योजनांचा मॅच्युरिटी कालावधी असतो, त्यानंतर तुम्ही या खात्यांमध्ये जमा केलेले पैसे काढू शकता.

मॅच्युरिटीच्या ठराविक मुदतीनंतरही पैसे काढले नाहीत, तर ती रक्कम दावा न केलेली म्हणजेच अनक्लेम्ड म्हणून घोषित केली जाते. अशी अनेक कारणं असू शकतात, ज्यामुळे खातेदार त्या रकमेवर दावा करू शकलेला नसतो. उदाहरणार्थ, खातेधारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अकाउंटवर कोणीच नॉमिनी नसणं. अ

शा रितीने अनेक बचत योजनांमध्ये लोकांचे कोट्यवधी रुपये कोणत्याही दाव्याशिवाय पडून आहेत. विशिष्ट कालावधीमध्ये कुणीही दावा न केलेला पैसा विशिष्ट निधीमध्ये ठेवला जातो. एनएससीची मॅच्युरिटी 5 वर्षे, एनपीए किमान 15 वर्षे आणि सीनिअर सिटिझन्स सेव्हिंग स्कीम योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षे आहे.

पैसे कोणत्या खास फंडामध्ये जातात?

PPF, NSC, EPF किंवा इतर सरकारी बचत योजनांमधले पैसे क्लेम न केल्यावर सीनिअर सिटिझन्स वेलफेअर फंडामध्ये जमा केले जातात. त्याची स्थापना 2015 मध्ये करण्यात आली होती. या फंडमध्ये पैसे टाकल्याने PPF, NACC आणि इतर बचत योजना चालवणारे विभाग ते खातं असलेल्या ग्राहकांशी संपर्क साधतात आणि पैसे घेण्यास सांगतात.

खात्याच्या मॅच्युरिटीनंतर 7 वर्षांपर्यंत खात्यातून पैसे काढले नाहीत, तर ते पैसे सीनिअर सिटिझन्स वेलफेअर फंडमध्ये पाठवले जातात. यानंतरही मूळ खातेदार 25 वर्षांपर्यंत तेथून पैसे काढू शकतात. मात्र, त्यांना त्यावेळी सीनिअर सिटिझन्स वेलफेअर फंडाशी संपर्क साधावा लागतो.

आपला फंड कसा ट्रॅक कराल

तुम्ही इंडिया पोस्ट वेबसाइटला भेट देऊन तुमचा अनक्लेम्ड फंड ट्रॅक करू शकता. यासाठी सर्वांत आधी तुम्हाला www.indiapost.gov.in वर लॉग इन करावं लागेल. त्यानंतरची प्रोसेस खालीलप्रमाणे आहे.

बँकिंग आणि रेमिटन्स वर क्लिक करा.

नवीन पानावर पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्क्रीनवर क्लिक करा.

सीनिअर सिटिझन्स वेलफेअर फंड निवडा.

आता KVS, PPF, NSC किंवा इतर योजना यापैकी एक योजना निवडा.

त्यानंतर तुमच्यासमोर राज्यनिहाय खात्याचे डिटेल्स दिसतील.

अशा रितीने सरकारी योजनेत गुंतवलेल्या आणि मॅच्युरिटीनंतरही क्लेम न केलेल्या पैशांवर तुम्ही दावा करू शकता.

First published:

Tags: Money