मराठी बातम्या /बातम्या /मनी /'या' वनस्पतीच्या व्यवसायातून चांगल्या कमाईची संधी; जाणून घ्या कसा होईल फायदा

'या' वनस्पतीच्या व्यवसायातून चांगल्या कमाईची संधी; जाणून घ्या कसा होईल फायदा

कमी गुंतवणुकीत अधिक फायद्याच्या दृष्टीने व्यवसायाची एक चांगली संधी आहे. परंतु यात शेती, फार्मिंगबाबत काहीशी माहिती असणं, महत्त्वाचं ठरेल. लेमन ग्रास शेतीद्वारे चांगली कमाई करता येऊ शकते.

नवी दिल्ली, 16 मार्च : कोरोना काळात अनेकांचे जॉब गेल्यानंतर अधिकतर लोक व्यवसायाकडे वळले आहेत. कमी गुंतवणुकीत अधिक फायद्याच्या दृष्टीने व्यवसायाची एक चांगली संधी आहे. परंतु यात शेती, फार्मिंगबाबत काहीशी माहिती असणं, महत्त्वाचं ठरेल. लेमन ग्रास शेतीद्वारे चांगली कमाई करता येऊ शकते. पंतप्रधान मोदींनीही लेमन ग्रास शेतीसाठी प्रोत्साहन दिलं आहे. Lemon Grass एक औषधी वनस्पती आहे. याचा वापर मेडिसिन, कॉस्मेटिक आणि डिटरजेंटमध्ये केला जातो.

कधी करता येते ही शेती -

ही शेती करण्याचा सर्वात चांगला कालावधी फेब्रुवारी ते जुलैदरम्यान असतो. एकदा याची शेती केल्यानंतर कमीत-कमी 6 ते 7 वेळा छाटणी करता येते. लेमन ग्रास शेती केल्यानंतर जवळपास 3 ते 5 महिन्यानंतर याची पहिली छाटणी केली जाते.

किती असते किंमत -

लेमन ग्रासचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. या ग्रासच्या एक लिटर तेलाची किंमत जवळपास 1 हजार रुपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंत असते.

कसं समजेल शेती तयारी झाली की नाही?

ही गोष्ट समजून घेण्यासाठी ही वनस्पती तोडल्यानंतर यात लिंबासारखा स्ट्रॉंग सुगंध आल्यास, लेमन ग्रासची शेती तयार झाली असं समजावं.

(वाचा - केवळ 50 हजार रुपयांत करा कोरफडीची लागवड, वर्षभरात होईल 10 लाख रुपये कमाई)

किती कराल छाटणी?

जमिनीपासून 5 ते 8 इंचावर याची छाटणी करावी. दुसऱ्या छाटणीमध्ये 1.5 ते 2 लिटर तेल निघतं. तीन वर्षात याची उत्पादन क्षमता वाढते.

किती येईल खर्च?

ही शेती करण्यासाठी जवळपास 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत खर्च येईल.

(वाचा - कमाई करण्यासाठी BEST पर्याय, 5000 रुपये गुंतवणून लाखो मिळवा; सरकारही करेल मदत)

किती होईल कमाई?

लेमन ग्रासमधून एका वर्षात 1 लाख ते 1.50 लाख रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते. खर्चात कपात केल्यानंतर वर्षभरात 70 हजार ते 1.20 लाख रुपयांपर्यंत प्रॉफिट होऊ शकतो.

First published:
top videos

    Tags: Investment, Money, Small business