'या' 5 गोष्टींमुळे तुमच्या बचतीत होईल वाढ

'या' 5 गोष्टींमुळे तुमच्या बचतीत होईल वाढ

आपण कमावतो आणि भविष्यकाळासाठी बचत करावी लागते. तुम्ही थोडी काळजी घेतलीत तर पुढचं आयुष्य तणावरहित जगू शकता.

  • Share this:

जेनी शहा

मुंबई, 18 मे : आपण कमावतो आणि भविष्यकाळासाठी  बचत करावी लागते. पण अनेकदा कळत-नकळत तुम्ही खर्च करत असता. मग निवृत्तीनंतर किंवा अचानक लागणारे पैसे यासाठी बचत रहात नाही. त्याला कारण तुमची लाइफस्टाइल, तुमचे खर्च असतात. तुम्ही थोडी काळजी घेतलीत तर पुढचं आयुष्य तणावरहित जगू शकता.

3 ते 4 लाखांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय, होईल लाखोंची कमाई

1. गरज असेल तेच खरेदी करा, इम्प्रेस करायला नको

अनेक जण दुसऱ्याला इम्प्रेस करायला खरेदी करत सुटतात. त्याला वेळीच आवर घातला पाहिजे. समजा तुम्हाला घड्याळाची गरज आहे. तर त्याची उपयोगिता पाहा. उगाच सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी अव्वाच्या सव्वा किमतीचं घड्याळ घ्यायची गरज नसते.

ऑफिसमधली उद्धट वागणूक असते संसर्गजन्य? काय सांगतोय हा रिसर्च?

2. प्रवास करायचा असेल तर शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करा

टॅक्सी किंवा रिक्षानं प्रवास करणं अनेक जणांसाठी अगदी सहज असते. पण सार्वजनिक वाहतुकीचा वापर तुमचे पैसे वाचवतो. तुमची स्वत:ची कार असेल तर डिझेल आणि पेट्रोल वाचेल. तुम्ही सतत बस किंवा ट्रेननंच प्रवास करा, असं नाही. तर महिन्यातून किती दिवस सार्वजनिक वाहतूक वापराल याचं नियोजन तुम्ही करू शकता.

चिकनचा तुकडा खाताना झाला मृत्यू, घटना ऐकून तुम्हीही हडबडाल!

3. हाॅटेलमध्ये जाऊन खाण्याचं प्रमाण कमी करा

घरचं जेवण नेहमीच आरोग्यदायी असतं. त्यानं पैसेही वाचतात. अनेक जण दर वीकेण्डला घराबाहेर लंच किंवा डिनर घेतात. ते नक्कीच टाळता येईल.

4. खरेदीचं व्यसन टाळा

अनेकांना खरेदीचं व्यसन असतं. पण त्याला वेळीच आवर घालावा. पूर्वीची माणसं खरेदीची यादी करून खरेदीला जायची. ही पद्धत हास्यास्पद वाटू शकते. पण त्यानं अवास्तव खरेदी होत नाही आणि त्यानं पैसे वाचतात.

5. प्लॅस्टिक मनी वापरू नका

क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड हातात ठेवलं तर नक्कीच जास्त पैसे खर्च होतात. हातात रक्कम ठेवली की मर्यादित खर्च होतो. याची सवय अंगी बाणवा.

तुम्ही स्वत:लाच शिस्त लावलीत तर नक्कीच पैशांची बचत होईल आणि पुढचं आयुष्य एकदम तणावरहित जाईल.

VIDEO: मोदींच्या पत्रकार परिषदेबाबत राज ठाकरे म्हणतात, 'यासारखं दुर्दैवं नाही'

First published: May 18, 2019, 2:09 PM IST

ताज्या बातम्या