Home /News /money /

गच्चीचा करा पैसे कमावण्यासाठी वापर; गुंतवणूक न करता मिळवा लाखो रुपये

गच्चीचा करा पैसे कमावण्यासाठी वापर; गुंतवणूक न करता मिळवा लाखो रुपये

मच्या घराची रिकामी गच्ची तुम्हाला घरबसल्या लखपती बनवू शकते. त्यासाठी तुम्हाला वेगळी काही गुंतवणूक करण्याची गरज नाही.

    मुंबई 12 जुलै: तुम्ही राहता त्या घराची गच्ची (Terrace) रिकामी आहे का? मग त्या रिकाम्या जागेपासून कमाई करण्याची चांगली संधी तुमच्याकडे आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही व्यवसाय संधींबद्दल (Business Opportunities) सांगणार आहोत, की ज्याद्वारे तुमच्या घराची रिकामी गच्ची तुम्हाला घरबसल्या लखपती बनवू शकते. त्यासाठी तुम्हाला वेगळी काही गुंतवणूक करण्याची गरज नाही. थोडीशी सावधगिरी मात्र बाळगावी लागेल एवढं नक्की. सोलर पॅनेल (Solar Panel) - सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून कमाई करणं शक्य आहे. सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी सरकारही प्रोत्साहन देत आहे. अनुदान, तसंच सवलतीच्या व्याजदरांत कर्जसुविधा उपलब्ध आहे. सौर ऊर्जा (Solar Power Project) प्रकल्पासाठी आवश्यक पॅनेल्स गच्चीवर बसवली, तर तुमचं विजेचं बिल कमी येईल आणि बचत होईल. तसंच जास्त प्रमाणात वीजनिर्मिती झाली, तर तुम्ही ती वीज ग्रिडला विकून त्यातून पैसेही मिळवता येऊ शकतात. या खासगी बँकेत खातं असणाऱ्यांसाठी मोठी बातमी; RBI कडून महत्त्वाच्या निर्णयाला मंजुरी टेरेस फार्मिंग (Terrace Farming) - टेरेस फार्मिंग अर्थात गच्चीवरच्या शेतीतूनही तुम्हाला पैसे कमावता येऊ शकतात. त्यासाठी तुमच्या गच्चीवर ग्रीन हाउस (Green House) तयार करण्याची गरज आहे. त्यात पॉलिबॅगमध्ये भाजीपाल्याची रोपं लावता येऊ शकतात. ठिबक सिंचनाद्वारे त्यांना पाणी देता येऊ शकतं. याची चांगली देखभाल केली, तर ही गच्चीवरची शेती चांगली बहरू शकते. ती भाजी विकून पैसे मिळू शकतात. Gold Price Today: सोने-चांदी दरात घसरण, खरेदीची चांगली संधी; पाहा आजचा लेटेस्ट गोल्ड रेट मोबाइल टॉवर (Mobile Tower) - घराची किंवा इमारतीची गच्ची रिकामी असेल, तर मोबाइल कंपन्यांशी (Mobile Company) करार करून तुम्ही ही रिकामी जागा मोबाइल टॉवरसाठी देऊ शकता. टॉवर कार्यान्वित झाल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला जागेचं भाडं म्हणून कंपनीकडून काही रक्कम दिली जाते. अर्थात मोबाइल टॉवर बसवण्यासाठी तुम्हाला तुमच्या भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडून (ग्रामपंचायत/नगरपालिका/महापालिका) परवानगी घ्यावी लागते. होर्डिंग्ज (Hoardings) - तुम्ही राहत असलेली बिल्डिंग दूरवरून सहजपणे दिसत असेल किंवा एखाद्या मुख्य रस्त्याच्या शेजारी असेल, तर तुमच्या गच्चीवर होर्डिंग लावण्यासाठी परवानगी देऊन तुम्ही जाहिरात कंपन्यांकडून भाड्यापोटी पैसे मिळवू शकता. आउटडोअर अॅडव्हर्टायझिंग करणाऱ्या कंपन्या प्रत्येक शहरात असतात. त्या कंपन्या त्यांच्या क्लायंटच्या जाहिरातींसाठी (Advertisement) अशा मोक्याच्या जागा शोधत असतात. अर्थात, अशा जाहिरात एजन्सीला होर्डिंग लावण्याची परवानगी देण्याआधी संबंधित एजन्सीकडे सर्व प्रकारच्या परवानग्या आहेत ना, याची खात्री आणि पडताळणी करणं अत्यावश्यक आहे. परवानगी नसताना होर्डिंग लावलं, तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तुमच्या बिल्डिंगचं लोकेशन कुठे आहे, यावर होर्डिंगच्या भाड्याची रक्कम अवलंबून असते.
    First published:

    Tags: Business, Money, Small investment business

    पुढील बातम्या