आयडिया ! पती-पत्नी घरातच करतात मशरूमची शेती, आता होतेय चांगली कमाई

आयडिया ! पती-पत्नी घरातच करतात मशरूमची शेती, आता होतेय चांगली कमाई

एखादा धंदा सुरू करायचा तर नेमका कोणता करावा याबद्दल तुम्ही विचार करत असाल तर एक चांगला पर्याय आहे. एका दाम्पत्याने असंच घरातल्या घरात मशरूम म्हणजे अळंबी उत्पादन सुरू केलं.

  • Share this:

मुंबई, 7 फेब्रुवारी : एखादा धंदा सुरू करायचा तर नेमका कोणता करावा याबद्दल तुम्ही विचार करत असाल तर एक चांगला पर्याय आहे. एका दाम्पत्याने असंच घरातल्या घरात मशरूम म्हणजे अळंबी उत्पादन सुरू केलं. जमशेदपूरला राहणारे दिलीप शर्मा आणि त्यांची पत्नी संगीता कुमारी यांनी या बिझनेसची आयडिया काढली.

तापमान नियंत्रित हवं

त्यांनी घरातच मशरूमच्या उत्पादनासाठी एक जागा तयार केली. मशरूमच्या उत्पादनासाठी त्या जागेत सूर्यप्रकाश पोहोचणार नाही अशी काळजी घ्यावी लागते. आतमध्ये पंखा लावून तिथलं तापमानही नियंत्रित ठेवावं लागतं. जास्त थंडीतही मशरूम्स उगत नाहीत. त्याचबरोबर उष्म्यामध्येही त्यांचा टिकाव लागत नाही. एवढ्या सगळ्या स्थितीत आणि कमी जागेतही या दाम्पत्याने चांगली कमाई केलीय.

मशरूम उगवण्यासाठी लागतो 1 महिना

मशरूमच्या बिया गवतात गुंडाळून भिजवून सुकवल्या जातात. मग या बिया कॅरीबॅगनमध्ये ठेवून एका खोलीत लटकवून ठेवतात. जवळजवळ महिन्याभरात या बिया वाढून मशरून दिसू लागतात. याच काळात याला दिवसरात्र पाणी द्यावं लागतं. यासाठी एक विशिष्ट प्रकारचं इंजेक्शन वापरलं जातं. त्याचबरोबर वरून पाण्याचा शिडकावाही द्यावा लागतो.

(हेही वाचा :  रुपया घसरल्यामुळे सोनं झालं महाग, वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे भाव का?)

अळंबीतून चांगला फायदा

दिलीप आणि त्यांच्या पत्नी संगीता हे दोघं मिळून हे काम करतात. ते सांगतात, या मशरूम्सना हळूहळू मागणी वाढत चाललीय. सध्या याची विक्री छोट्या स्तरावर होते पण यासाठीचा खर्च पाहिला तर चांगला फायदा मिळतो. यासाठी आणखी चांगल्या सुविधा मिळाल्या तर मशरूम उत्पादनाचा हा धंदा चांगलाच विस्तारू शकतो.

============================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2020 08:19 PM IST

ताज्या बातम्या