Home /News /money /

महिन्याला 1000 रुपयांच्या गुंतवणुकीतून जमवा दोन कोटींची संपत्ती; किती दिवस लागतील?

महिन्याला 1000 रुपयांच्या गुंतवणुकीतून जमवा दोन कोटींची संपत्ती; किती दिवस लागतील?

Mutual fund: म्युच्युअल फंडात जर तुम्ही 20 वर्षांसाठी 1000 रुपये दरमहा गुंतवले. जर तुम्हाला यावर 12 टक्के परतावा मिळत असेल तर 20 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 9,99,148 रुपये मिळतील. 20 वर्षात तुमच्याकडे एकूण 2,40,000 रुपये जमा झाले असतील.

पुढे वाचा ...
    मुंबई, 7 जून : गुंतवणूक (Investment) सध्याच्या घडीला भविष्य सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाची आहे. काहींना विनाजोखीम कमी परतावा हवा असतो, तर काहींना मोठा परतावा हवा असतो. अनेकजण बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये (Bank and Post Office Investment) गुंतवणूक करा. जर तुम्हाला कमी गुंतवणुकीवर अधिक परतावा हवा असेल तर म्युच्युअल फंडातील SIP (Mutual Fund SIP) हा उत्तम पर्याय असू शकतो. यात तुम्ही दरमहा 1000 रुपये जमा करून 2 कोटींहून अधिक परतावा मिळवू शकता. म्युच्युअल फंडातील SIP मध्ये किती व्याज मिळते आणि किती कालावधी लागतो याची माहिती घेऊ. बँका आणि पोस्ट ऑफिस पेक्षा जास्त परतावा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सामान्यतः लोक बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये एफडी करून घेतात. मात्र, त्यातून फारसा परतावा मिळत नाही. जर तुम्ही 20 वर्षांसाठी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये दरमहा 1000 रुपये जमा करत असाल. या कालावधीत 2.40 लाख रुपये जमा होतील. तीच रक्कम तुम्ही म्युच्युअल फंडात जमा केल्यास तुम्हाला अधिक नफा मिळेल. आजच्या काळात 1000 ही मोठी रक्कम नाही, कोणीही इतके पैसे वाचवू शकतो. म्युच्युअल फंडातील सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) मध्ये दरमहा 1000 गुंतवून कोणीही करोडपती बनू शकतो. काही फंडांनी 20 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. Tata ग्रुपच्या 'या' कंपनीमुळे गुंतवणूकदार बनले कोट्यधीश, 17 रुपयांचा शेअर 8600 रुपयांवर 20 वर्षात इतका परतावा मिळेल म्युच्युअल फंडात जर तुम्ही 20 वर्षांसाठी 1000 रुपये दरमहा गुंतवले. जर तुम्हाला यावर 12 टक्के परतावा मिळत असेल तर 20 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 9,99,148 रुपये मिळतील. 20 वर्षात तुमच्याकडे एकूण 2,40,000 रुपये जमा झाले असतील. जर तुम्हाला गुंतवणुकीवर 15 टक्के परतावा मिळत असेल तर तुम्हाला 15,15,995 रुपये मिळतील. दुसरीकडे, जर तुम्हाला 20 टक्के परतावा मिळत असेल, तर 1000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 20 वर्षांनंतर तुम्हाला 31,61,479 रुपये मिळतील. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांचा मुक्काम असलेले Westin हॉटेल आहे तरी कसं? एका दिवसासाठी साधारण किती खर्च येतो? 30 वर्षांनंतर 2.33 कोटी जर तुम्हाला गुंतवणुकीवर अधिक परतावा हवा असेल तर तुम्हाला 30 वर्षांसाठी 1000 रुपये जमा करावे लागतील. 1000 रुपयांच्या SIP वर 30 वर्षांनंतर, 12 टक्के रिटर्ननुसार 35,29,914 रुपये उपलब्ध आहेत. व्याज थोडे जास्त असल्यास, 15% दराने, 70 लाख रुपये मिळ शकतात. दरमहा 1000 रुपये जमा करुन 20 टक्के परतावा मिळाला तर 30 वर्षांनंतर तुम्हाला 2,33,60,802 रुपये मिळतील. 30 वर्षात तुमचे फक्त 3 लाख 60 हजार रुपये जमा होतील, यावर हा परतावा मिळेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Mutual Funds

    पुढील बातम्या