नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : चांदीचे दर (Silver Price Today) आज वाढल्याचे पाहायला मिळते आहे. चांदीच्या दरात आज बाजार सुरू होताच 43 रुपयांची वाढ झाली होती आणि आणि त्यानंतर तासाभरातच चांदीमध्ये 50 रुपयांपेक्षा अधिक घसरण देखील झाली. गेल्या काही वेळापासून चांदीवरील दबाव वाढत आहे. ऑगस्ट महिन्यात चांदीचे दर 77 हजारांच्या वर पोहोचले होते. या सर्वोच्च स्तरावर आता चांदी पंधरा हजारांनी कमी झाली आहे. सध्या चांदीचे दर 62-63 हजारांवर ट्रेड करत आहेत.
दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचांदीची झळाळी गुरुवारी कमी झाल्याचे पाहायला मिळालं. सोन्याची किंमत 95 रुपये प्रति तोळाने कमी होत 51,405 रुपये झाली होती. आधीच्या सत्रात 51,500 रुपये रुपये प्रति तोळावर सोन्याचं ट्रेडिंग बंद झालं होतं. तर गुरुवारी चांदी देखील 504 रुपयांनी कमी झाली होती. यानंतर चांदीचे दर 63,425 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. आधीच्या सत्रात चांदीचे दर 63,929 रुपये प्रति किलो होते.
(हे वाचा-सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक खूशखबर! पगारवाढ करण्याच्या तयारीत सरकार)
चांदीच्या किंमतीत घसरण
एमसीएक्सवर 4 डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या चांदीची किंमत 43 रुपयांनी कमी झाली आहे. 62658 रुपये प्रति किलो दराने आज चांदीचे दर सुरू झाले आहेत. गुरुवारी हे दर 62615 वर बंद झाले होते. सकाळी 9.55 वाजता चांदीच्या किंमतीत विशेष दबाव पाहायला मिळत होता. यानंतर चांदीचे दर 55 रुपयांनी कमी होऊन 62560 रुपये प्रति किलोच्या स्तरावर ट्रेड करत होते. तज्ज्ञांच्या मते चांदीमध्ये आता केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. सध्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये चांदीच्या दरात तेजी आली आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत किंमतीवर होत आहे.
(हे वाचा-बँक खात्यात पैसे नसतील तरीही करता येईल UPI पेमेंट, वाचा काय आहे ही प्रक्रिया)
आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी (Silver Rates in International Market)
आंतरराष्ट्रीय बाजारात किरकोळ तेजी पाहायला मिळते आहे. इन्व्हेस्टिंग डॉट कॉम या वेबसाइटवरील माहितीनुसार सकाळी 10 वाजता 20 डिसेंबरच्या डिलीव्हरीच्या चांदीमध्ये 0.024 डॉलरची तेजी आली आहे. परिणामी चांदीचे दर 24.73 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. गुरुवारी चांदीचे दर घसरणीनंतर 24.70 डॉलर प्रति औंस या स्तरावर बंद झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.