Home /News /money /

Gold Silver Price: चांदी 64,500 पार, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर

Gold Silver Price: चांदी 64,500 पार, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर

आज सोने दरात (Gold Silver Price Today) तेजी आहेत. तर चांदीच्या दरात (Silver price) काहीशी घसरण पाहायला मिळाली आहे.

    नवी दिल्ली, 24 जानेवारी : लग्नसराईचा सीजन सुरू आहे. त्यामुळेच बाजारात सोने-चांदी दरात चढ-उतार सुरू आहेत. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज सोने दरात (Gold Silver Price Today) तेजी आहेत. तर चांदीच्या दरात (Silver price) काहीशी घसरण पाहायला मिळाली आहे. आज फेब्रुवारी डिलीवरी सोन्याच्या भावात 0.13 टक्क्यांची वाढ झाली. तर चांदीच्या दरात 0.26 टक्क्यांची घसरण झाली.

    हे वाचा - ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची खास बचत योजना, जाणून घ्या अधिक माहिती

    काय आहे सोने-चांदी दर - फेब्रुवारी डिलीवरी गोल्डची किंमत आज 0.13 टक्क्यांच्या वाढीसह 48,312 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीचा दर 0.26 टक्क्यांनी घसरला असून आज एक किलोग्रॅम चांदीचा भाव 64,640 रुपये आहे. 2020 मध्ये याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा दर 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता. आज MCX वर डिसेंबर सोन्याचा वायदे भाव 48,312 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सर्वोच्च स्तरावरुन सोनं जवळपास 7,888 रुपयांनी स्वस्त मिळत आहे.

    हे वाचा - Petrol-Diesel Prices Today:80 दिवस उलटूनही इंधन दराबाबत सामान्यांना दिलासा नाही

    24 कॅरेट सोन्याचा दर (24 carat Gold Price in Maharashtra)-
    शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
    मुंबई49520 रुपये49560 रुपये
    पुणे49320 रुपये49310 रुपये
    नाशिक49320 रुपये49310 रुपये
    नागपूर49520 रुपये49560 रुपये
    22 कॅरेट सोन्याचा दर (22 carat Gold Price in Maharashtra)-
    शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
    मुंबई47520 रुपये47560 रुपये
    पुणे46780 रुपये46770 रुपये
    नाशिक46780 रुपये46770 रुपये
    नागपूर47520 रुपये47560 रुपये
    चांदीचा दर (Silver Price in Maharashtra) -
    शहरआजचा दर (प्रति किलो)कालचा दर (प्रति किलो)
    मुंबई64800 रुपये64900 रुपये
    पुणे64800 रुपये64900 रुपये
    नाशिक64800 रुपये64900 रुपये
    नागपूर64800 रुपये64900 रुपये
    मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today

    पुढील बातम्या