Home /News /money /

Gold Rate Today: सोन्याच्या दरात आज मोठी घसरण, स्वस्तात सोनं खरेदीची संधी

Gold Rate Today: सोन्याच्या दरात आज मोठी घसरण, स्वस्तात सोनं खरेदीची संधी

सोने आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 4,351 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

    मुंबई, 1 जुलै : सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Prices Drop) आज 1 जुलै रोजी मोठा बदल झाला आहे. आज सराफा बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोने (Gold Price Today) 968 रुपयांनी महागले असून ते प्रति 10 ग्रॅम 51849 रुपयांवर पोहोचले आहे. त्याचबरोबर आज चांदी (Silver Price Today) स्वस्त झाली आहे. चांदीचा दर 403 रुपयांनी घसरला आहे. एक किलो चांदीची किंमत 58400 रुपये झाली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर 51849 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तो 50863 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाला. अशा प्रकारे आज सोन्याचा दर 986 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या वाढीसह उघडला आहे. मात्र यानंतरही, सोने आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 4,351 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 5 टक्क्यांनी वाढवलं, सोन्याच्या किमतीवर काय परिणाम होणार? चांदीही महागली आज चांदीचा दर 58400 रुपये प्रति किलोवर खुला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 58803 प्रति किलोच्या दराने बंद झाली होती. अशा प्रकारे आज चांदीचा दर 403 रुपयांच्या घसरणीसह उघडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची घसरण झाली आहे. अमेरिकेत सोने 9.53 डॉलरनी घसरून 1,797.27 डॉलर प्रति औंस वर व्यवहार करत आहे. दुसरीकडे, चांदी 0.23 डॉलरच्या घसरणीसह 20.03 डॉलर प्रति औंस पातळीवर व्यवहार करत आहे. आजपासून अनेक नवीन आर्थिक बदल लागू; तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल? मिस्ड कॉल देऊन सोन्याचे दर तपासा सोन्या-चांदीची किंमत तुम्ही घरबसल्या सहजपणे जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर मेसेज येईल. येथे तुम्ही नवीनतम दर तपासू शकता. सोन्याची शुद्धता कशी तपासणार? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Investment

    पुढील बातम्या