मराठी बातम्या /बातम्या /मनी /आजपासून बाजारात दाखल होतोय आणखी एका कंपनीचा IPO, जाणून घ्या प्राइस बँड आणि इतर माहिती

आजपासून बाजारात दाखल होतोय आणखी एका कंपनीचा IPO, जाणून घ्या प्राइस बँड आणि इतर माहिती

दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली रिअल इस्टेट (Real-estate company) कंपनी श्रीराम प्रॉपर्टीजचा (Shriram Properties IPO) आयपीओ आज मार्केटमध्ये दाखल होत आहे. गुंतवणूकदारांना 10 डिसेंबरपर्यंत कंपनीचा आयपीओ सबस्क्राईब करता येणार आहे.

दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली रिअल इस्टेट (Real-estate company) कंपनी श्रीराम प्रॉपर्टीजचा (Shriram Properties IPO) आयपीओ आज मार्केटमध्ये दाखल होत आहे. गुंतवणूकदारांना 10 डिसेंबरपर्यंत कंपनीचा आयपीओ सबस्क्राईब करता येणार आहे.

दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली रिअल इस्टेट (Real-estate company) कंपनी श्रीराम प्रॉपर्टीजचा (Shriram Properties IPO) आयपीओ आज मार्केटमध्ये दाखल होत आहे. गुंतवणूकदारांना 10 डिसेंबरपर्यंत कंपनीचा आयपीओ सबस्क्राईब करता येणार आहे.

    नवी दिल्ली, 08 डिसेंबर: आपल्यापैकी अनेकांना आयपीओ (IPO investment) मार्केटमधील गुंतवणुकीची माहिती असेल. काहीजण तर विविध आयपीओंमध्ये पैसे गुंतवतही असतील. जर तुम्ही त्यापैकी एक असाल तर आज (8 डिसेंबर 2021) तुमच्यासाठी एक नवीन पर्याय खुला होत आहे. दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली रिअल इस्टेट (Real-estate company) कंपनी श्रीराम प्रॉपर्टीजचा (Shriram Properties IPO) आयपीओ आज मार्केटमध्ये दाखल होत आहे. गुंतवणूकदारांना 10 डिसेंबरपर्यंत कंपनीचा आयपीओ सबस्क्राईब करता येणार आहे. प्रति शेअर 113 ते 118 रुपये असा प्राईस बँड (Price band) निश्चित करण्यात आला आहे. कंपनीच्या आयपीओ इश्युमध्ये, नवीन इक्विटी शेअर्सव्यतिरिक्त, ऑफर फॉर सेलदेखील असेल. जर तुम्ही देखील या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर अगोदर त्याबद्दल तपशील जाणून घेणं गरजेचं आहे.

    श्रीराम प्रॉपर्टीज ही श्रीराम ग्रुपची (Shriram Group) रिअल इस्टेट कंपनी आहे. मिड मार्केट आणि अफॉर्डेबल हाउसिंग सेगमेंटवर कंपनीचा फोकस आहे. याशिवाय मिड-मार्केट प्रीमियम, आरामदायक घरं, कमर्शियल आणि ऑफिस स्पेस कॅटेगरींमध्येही कंपनी काम करते. कोरोनाच्या काळात कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागला. त्यामुळे कंपनीने आयपीओ मार्केटमध्ये आणला आहे. या पब्लिक आयपीओ इश्युमध्ये 250 कोटी रुपये किमतीच्या नवीन इक्विटी शेअर्सचा (Equity shares) समावेश आहे. यामध्ये विक्रीसाठी 350 कोटी रुपयांच्या ऑफरचाही समावेश आहे. फर्मनं आपली पूर्वीची ऑफर फॉर सेल साइज (550 कोटी) कमी करून 350 कोटींवर आणली आहे. मार्केट ऑब्जर्व्हर्सच्या मते, आज ग्रे मार्केटमध्ये श्रीराम प्रॉपर्टीजचे शेअर्स 16 रुपयांच्या प्रीमियमवर (GMP) आहेत. 20 डिसेंबर 2021 रोजी कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्सचेंज BSE आणि NSE वर सूचीबद्ध होण्याची अपेक्षा आहे.

    हे वाचा-आज या दराने खरेदी करावं लागणार इंधन, मुंबईत अजूनही पेट्रोल 110 रुपयांवर

    एसपीएल (SPL) ही दक्षिण भारतातील प्रमुख निवासी रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपन्यांपैकी एक आहे. बंगळुरू आणि चेन्नई या दक्षिण भारतातील प्रमुख मार्केटमध्ये तिचा दबदबा होता. महामारीच्या दुसऱ्या लाटेत एसपीएलच्या व्यवसायावर गंभीर परिणाम झाला होता. मात्र, येत्या तिमाहीत (quarters) तुलनेने कंपनी चांगला बिझनेस करण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया चॉईस ब्रोकिंगच्या विश्लेषकांनी इश्युसाठी सबस्क्राइब रेटिंग देताना व्यक्त केली.

    लाइव्ह मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीची सध्याची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. कंपनीच्या ऑपरेशन्समधून मिळणाऱ्या उत्पन्नात 20.7 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. कंपनीला फक्त 60 कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे. कंपनीच्या मागील व्यवसायाचा विचार केल्यास त्या तुलनेत ही आकडेवारी फारशी चांगली नाही. या आयपीओच्या किमतीचा विचार केला तर त्याची किंमत बूक व्हॅल्यूच्या 2.27 पट आहे. त्याचे पिअर असलेल्या शोभा लिमिटेड आणि प्रेस्टिजच्या किमती बूक व्हॅल्युच्या तिप्पट आहेत तशीच या आयपीओची किंमत सध्या दिसते आहे. एकूणच श्रीराम प्रॉपर्टीज लिमिटेडच्या आयपीओबाबत आम्ही सकारात्मक आहोत, असं एंजल वनचे (Angel One) इक्विटी रिसर्च अॅनालिस्ट (Equity Research Analyst) यश गुप्ता म्हणाले.

    हे वाचा-Gold Rate Today: सोन्याचा दर 47 हजारांपार, काय आहे तुमच्या शहरातील आजचा भाव

    आयपीओ इश्युमधून मिळणारं निव्वळ उत्पन्न, कर्जाची परतफेड आणि कर्जाचं प्री-पेमेंट तसंच सामान्य कॉर्पोरेट कामांसाठी वापरण्याची योजना कंपनीनं आखली आहे. दरम्यान, श्रीराम प्रॉपर्टीजनं त्याच्या आयपीओच्या अगोदर आपल्या अँकर इन्व्हेस्टर्सकडून 268 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली आहे.

    First published:

    Tags: Investment, Money