• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Short Term Pick : 'या' स्टॉक्समधून मिळू शकतात चांगले रिटर्न, 3-4 आठवड्यात होऊ शकते चांगली कमाई

Short Term Pick : 'या' स्टॉक्समधून मिळू शकतात चांगले रिटर्न, 3-4 आठवड्यात होऊ शकते चांगली कमाई

निफ्टी 17,600 च्या दिशेने दिसत आहे. यावेळी निफ्टी लोअर लो, लोअर हाय पॅटर्न तयार करत आहे. डेली चार्टवर निफ्टी 20-दिवसांच्या SMA च्या खाली दिसत आहे.

 • Share this:
  मुंबई, 8 नोव्हेंबर : शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी चांगल्या शेअरची निवड करणे महत्त्वाची असते. त्यासाठी शेअर निवडताना कपंनीची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक असते. अनेक तज्ज्ञ विविधं कपन्यांच्या शेअरबाबत माहिती देत असतात. गेल्या 2 आठवड्यांपासून निफ्टीमध्ये नफा रिकव्हरी होताना दिसत आहे. निफ्टी 17,600 च्या दिशेने दिसत आहे. यावेळी निफ्टी लोअर लो, लोअर हाय पॅटर्न तयार करत आहे. डेली चार्टवर निफ्टी 20-दिवसांच्या SMA च्या खाली दिसत आहे. GEPL CAPITAL चे करण पै म्हणतात की, 18,050 ची पातळी (20-Day SMA) नजीकच्या काळात निफ्टीसाठी रजिस्टन्स म्हणून काम करेल. जोपर्यंत निफ्टी 18,050 च्या खाली राहतो तोपर्यंत त्यात आणखी करेक्शन दिसू शकते आणि आपल्याला 17,432 कडे जाताना दिसू शकते किंवा साईडवेज ट्रेड होताना दिसेल. दुसरीकडे, 20 Day SMA वर टिकून राहिल्यास, आपण असे गृहीत धरू शकतो की करेक्शन थांबत असल्याचे दिसत आहे. निफ्टी आता 18,400 -18,600 आणि त्यापुढील नवीन उच्चांकाकडे जाताना दिसतोय. Paytm, IPO : पेटीएमच्या आयपीओचं सबस्क्रिप्शन आजपासून सुरू, गुंतवणुकीबाबत काय आहे तज्ज्ञांचा सल्ला? आजचे 3 कॉल ज्यामध्ये 3-4 आठवड्यांत मोठी कमाई होऊ शकते Shobha : BUY | LTP: 950.60 रुपये हा स्टॉक 850 रुपयांच्या स्टॉप लॉससह खरेदी करा आणि 1127 चे टार्गेट ठेवा. 3-4 आठवड्यांत हा स्टॉक 18.6 टक्क्यांपर्यंत रिटर्न देऊ शकते. Nykaa IPO : शेअर अलॉटमोंट आज होणार, डिटेल कसे चेक कराल? L&T : BUY | LTP: 1908.95 रुपये | हा शेअर 2258 च्या टार्गेटसह 1730 च्या स्टॉप लॉसवर खरेदी करा. 3-4 आठवड्यांत शेअर 18.3 टक्के रिटर्न देऊ शकतो J & K Bank : BUY | LTP: 45.25 रुपये या स्टॉकमध्ये 38 रुपयांच्या स्टॉप लॉससह खरेदी करा आणि 53.35 चे टार्गेट ठेवा. हा शेअर 3-4 आठवड्यांत 18 टक्के रिटर्न देऊ शकतो.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: