Home /News /money /

तुमच्याकडे Rupay Card असल्यास मिळवा जबरदस्त ऑफर्स! याठिकाणी शॉपिंगवर आहे कमाल Discount

तुमच्याकडे Rupay Card असल्यास मिळवा जबरदस्त ऑफर्स! याठिकाणी शॉपिंगवर आहे कमाल Discount

Rupay कार्डवरून तुम्ही तर ऑनलाइन शॉपिगचं करताना पेमेंट करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या ईकॉमर्स साइटवर तुम्हाला चांगल्या ऑफर्स मिळतील

    नवी दिल्ली, 05 डिसेंबर: नुकत्याच संपलेल्या फेस्टिव्ह सीझनमध्ये अनेकांनी मोठ्या प्रमाणात शॉपिंग केलं आहे. विशेषत: ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांची संख्या या काळात वाढली आहे. तुम्हाला या फेस्टिव्ह सीझनमध्ये आलेल्या ऑफर्सचा फायदा घेता आला नसेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. आता देखील अनेक ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून चांगले डिस्काउंट मिळवता येईल. याकरता तुमच्याकडे केवळ रुपे (RuPay Card) कार्ड असणं आवश्यक आहे. Amazon, Flipkart आणि Myntra वर ऑफर तुम्ही जर कपड्यांचे शौकिन असाल तर Myntra वर शॉपिंग करू शकता. Myntra कडून रुपे कार्डने पेमेंट करणाऱ्या युजर्सना 7 टक्के रिवॉर्ड पॉइंट मिळतील. 1 एप्रिल 2021 पर्यंत Myntra वर ही ऑफर आहे. त्याचप्रमाणे Amazon वर शॉपिंग करणार असाल तर तुम्हाला 10.4 टक्के रिवॉर्ड पॉइंट मिळतील. तर फ्लिपकार्टवर शॉपिंग केली तरी तुम्हाला काही ब्रँड्सवर 70 टक्के डिस्काउंट मिळेल आणि 1050 रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. फ्लिपकार्टवर ही ऑफर 1 एप्रिल 2021 पर्यंत आहे. (हे वाचा-रेल्वे प्रवाशांसाठी विशेष सूचना! भारतीय रेल्वेने आजही रद्द केल्या काही गाड्या) औषध खरेदीवरही डिस्काउंट जर तुम्ही अपोलो फार्मसीवरून औषधं मागवली आणि रुपे कार्डने पेमेंट केलं तर तुम्हाला 10 टक्के डिस्काउंट मिळेल. ही ऑफर या महिन्याच्या अखेरपर्यंतच आहे. याशिवाय DocsApp वरून तुम्ही जर डॉक्टरांचा सल्ला घेतला तर तुम्हाला केवळ 21 रुपये महिना द्यावे लागतील. या app वर RuPay कार्डने पेमेंट केल्यास तीन वेळा ही सुविधा मिळेल. मेडलाइफ वरून औषधखरेदी केल्यानंतर RuPay कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 25 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. यावर्षा अखेर पर्यंत ऑफर्स आहेत. (हे वाचा-फरार विजय मल्ल्याला आणखी एक झटका! ED ने फ्रान्समधील फ्लॅट केला जप्त) ट्रॅव्हल साइट्सवर डिस्काउंट जर तुम्हाला फिरण्याची आवड आहे आणि थॉमस कुक वरून बुकिंग करण्याचा  विचार करत असाल तर तुम्हाला चांगली ऑफर मिळेल. याकरता तुम्हाला रुपे कार्डवरून पेमेंट करावं लागेल. अशाप्रकारे पेमेंट केल्यास तुम्हाला 4 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल.  ही ऑफर या महिन्याच्या अखेरपर्यंतच आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Amazon, Flipkart, Money

    पुढील बातम्या