Home /News /money /

'या' कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना केलं मालामाल; अवघ्या वर्षभरात 10 पटीने वाढली शेअरची किंमत

'या' कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना केलं मालामाल; अवघ्या वर्षभरात 10 पटीने वाढली शेअरची किंमत

Godawari Powerचे शेअर त्यांच्या 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस,100 दिवस आणि 200 दिवसांच्या डेली मुव्हिंग अ‍ॅव्हरेजपेक्षा (DMA) वर ट्रेड करत आहेत.

    मुंबई, 16 जून: गेल्या एका वर्षात गोदावरी पॉवरने (Godawari Power) आपल्या गुंतवणुकदारांना (Investors) भरपूर नफा मिळवून दिलाय. वर्षभरापूर्वी या कंपनीत एखाद्या गुंतवणूकदाराने 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर तो आता 9.96 लाख रुपयांचा मालक झाला असेल. म्हणजेच गेल्या एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 10 पटीने वाढले आहेत. गोदावरी पॉवर ही छत्तीसगडची पॉवर कंपनी (Chhattisgarh Power Company) आहे. गोदावरी पॉवरच्या (Godawari Power) स्टॉकमध्ये एका वर्षात 896% ची तेजी आली आहे. 15 जून 2020 रोजी या कंपनीच्या एका शेअरची किंमत 156.80 रुपये होती, ती आता 1561.95 रुपये झाली आहे. यादरम्यान सेंसेक्समध्ये केवळ 58.95% आणि निफ्टीमध्येही (Nifty) साधारणपणे एवढीच वाढ झाली आहे. याबाबत मनी कंट्रोलनं वृत्त दिलंय. BSE वर Godawari Powerचे शेअर बुधवारी (16 जून 2021) मोठ्या वाढीसह उघडले आणि गेल्या 52 आठवड्यांतील सर्वाधिक (52 Weeks High) 1561.95 रुपयांवर पोहोचले. मात्र सुरुवातीच्या सत्रातच शेअरमध्ये घसरण झाली असून आज कंपनीच्या शेअरमध्ये 4.77% ची घट होऊन 1430.75 रुपयांवर बंद झाले. आजच्या सात सत्रांनंतर कंपनीच्या स्टॉक्समध्येही घसरण झाल्याचं दिसून आलं. तर याआधीच्या पाच सत्रात कंपनीने 43% रिटर्न दिला आहे. घरामध्ये सोन्याचे दागिने आहेत तर महत्त्वाची बातमी, हा नियम बदलल्यानंतर काय होणार तुमच्या ज्वेलरीचं Godawari Powerचे शेअर त्यांच्या 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस,100 दिवस आणि 200 दिवसांच्या डेली मुव्हिंग अ‍ॅव्हरेजपेक्षा (DMA) वर ट्रेड करत आहेत. कंपनीच्या स्टॉक्समध्ये आलेल्या या तेजीमुळे कंपनीची मार्केट कॅप 5004 कोटी रुपये झाली आहे. या महिन्यात आतापर्यंत या कंपनीचे शेअर 53 टक्क्यांनी वाढले आहेत. छत्तीसगडच्या या पॉवर कंपनीने रिटर्न देण्याच्या बाबतीत त्यांच्या सर्व प्रतिस्पर्धी कंपन्यांना मागे टाकलंय. गेल्या एका वर्षात जेएसडब्ल्यू स्टीलचे (JSW Steel) शेअर 59% वाढले असून टाटा स्टील ( Tata Steel) कंपनीच्या शेअरमध्ये 283.74%, SAILच्या शेअरमध्ये 371% आणि हिंदाल्को इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 169% नी वाढ झाली आहे. Godawari Powerच्या शेअरमध्ये कंपनीच्या मजबूत फायनेन्शिअल रिझल्ट्समुळे एवढी मोठी तेजी आली आहे. FY21 च्या Q4 मध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट 879% वाढून 326.95 कोटी रुपये झालंय. जे गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत केवळ 33.37 कोटी रुपये होतं. कंपनीच्या सेल्समध्ये ( Sales) 60% तेजी आली असून सेल्स सध्या 1262.25 कोटी रुपये आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Share market

    पुढील बातम्या