मुंबई, 16 नोव्हेंबर : भारतीय शेअर बाजार सध्या विक्रमी पातळीवर आहेत. मुंबई शेअर बाजाराचा (BSE) सेन्सेक्स (Sensex) आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निफ्टी (Nifty) हे दोन्ही निर्देशांक उच्च पातळीवर आहेत. बाजारात नजीकच्या काळात काही मोठी समस्या उद्भवेल असे संकेत दिसत नाहीत. चांगल्या जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातली उलाढाल होताना दिसली. 15 नोव्हेंबरच्या शेअर बाजार उलाढालीत बीसएई मिडकॅप इंडेक्स 0.4 टक्क्यांनी वाढून बंद झाला होता. तसंच, स्मॉलकॅप इंडेक्स 0.2 टक्क्यांनी कमी होऊन बंद झाला होता.
इथे आम्ही शेअरखान ब्रोकरेज हाउसच्या पसंतीच्या अशा काही स्मॉलकॅप स्टॉक्सची (Small Cap Stocks) यादी देत आहोत, की ज्यात 31 टक्क्यांपर्यंतच्या परताव्याची अपेक्षा शेअरखानला (ShareKhan Brokerage House) आहे. त्यावर एक नजर टाकू या.
HealthCare Global Enterprises शेअरखानने या स्टॉकला Buy रेटिंग देताना सांगितलं आहे, की मिड ते लाँग टर्मपर्यंत या स्टॉकच्या किमतीत 24 टक्क्यांपर्यंत वाढ पाहायला मिळू शकते. सध्या हा शेअर 258 रुपयांच्या आसपास आहे.
PM KISAN मध्येही होतोय घोटाळा! 'या' शेतकऱ्यांकडून सरकार वसूल करणार पैसे
Thermax चा शेअर खरेदी करावा, अशीही शेअरखानची शिफारस आहे. या खरेदीसाठी टार्गेट 1869 रुपये आहे. सध्या हा शेअर 1633 रुपयांच्या आसपास आहे. शेअरखानच्या म्हणण्यानुसार, या कंपनीची बॅलन्सशीट मजबूत आहे. त्या कंपनीकडे मोठ्या प्रमाणावर ऑर्डर आहे आणि नव्या ऑर्डर्सही मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. पुढे जाऊन या शेअरमध्ये 14 टक्क्यांचा रिटर्न अगदी सहजपणे पाहायला मिळू शकतो, असा अंदाज आहे.
Affle India या शेअरलाही शेअरखानकडून Buy रेटिंग देण्यात आलं आहे. त्यासाठी 1400 रुपयांचं टार्गेट देण्यात आलं असून, सध्या हा शेअर 1199 रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. शेअरखानच्या म्हणण्यानुसार, एका वर्षाच्या कालावधीत या शेअरमधून 16 टक्क्यांचा रिटर्न पाहायला मिळू शकतो.
Greenlam Industries चे शेअर्सदेखील खरेदी करावेत, अशी शेअरखानची शिफारस आहे. या स्टॉकसाठी शेअरखानने 1818 रुपयांचं टार्गेट ठेवलं आहे. सध्या हा शेअर 1410 रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. शेअरखानच्या म्हणण्यानुसार एका वर्षाच्या कालावधीत हा शेअर 29 टक्के रिटर्न देऊ शकतो. या कंपनीला पुढे क्षमतावृद्धीचा फायदा मिळत असल्याचं पाहायला मिळेल.
Digital Gold बाबत मोठ्या निर्णयाच्या विचारात सरकार, SEBI आणि RBI आखत आहेत योजना
KEC International चे शेअर्स खरेदी करण्याची शिफारसही शेअरखानने केली आहे. सध्या हा शेअर 462 रुपयांच्या आसपास असून, त्यासाठी शेअरखानने 565 रुपयांचं टार्गेट दिलं आहे. शेअरखानच्या म्हणण्यानुसार, हा स्टॉक 12 महिन्यांत 22 टक्के रिटर्न देऊ शकतो. कंपनीला भरपूर ऑर्डर्स मिळत असून, त्याचा फायदा मिळत असल्याचं दिसेल.
Greenpanel Industries चा शेअर सध्या 389 रुपये किमतीला आहे. त्यासाठी 510 रुपयांचं टार्गेट ठेवून खरेदीची शिफारस शेअरखानकडून करण्यात आली आहे. एका वर्षाच्या कालावधीत या शेअरमध्ये 31 टक्के वाढ पाहायला मिळू शकेल, असा अंदाज आहे. कंपनीला पुढे आपल्या क्षमतावृद्धीचा फायदा मिळत असल्याचं पाहायला मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Share market