• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओतील Top 5 stocks; काही शेअर्समधून 200 टक्क्यांहून जास्तीचा फायदा

Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओतील Top 5 stocks; काही शेअर्समधून 200 टक्क्यांहून जास्तीचा फायदा

राकेश झुनझुनवाला यांचे टाटा मोटर्स कंपनीत सुमारे 3,77,50,000 शेअर्स किंवा 1.14 टक्के हिस्सा आहे. तर टायटनचे 3,30,10,395 शेअर्स आहेत

 • Share this:
  मुंबई, 19 ऑक्टोबर :  राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) नेमके कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात यावर इतर गुंतवणूकदारांची बारीक नजर असते. कारण राकेश झुनझुनवाला ज्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात तो शेअर वधारतो असं दिसून येतं. त्यामुळे त्यांच्या बाजारातील खरेदी विक्रीवर इतर गुंतवणूकदार आपला कल ठरवतात. त्यामुळे राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये (Rakesh Jhunjhunwala Portfolio) असलेल्या टॉप -5 स्टॉक बद्दल माहिती घेऊयात ज्यांनी यावर्षी त्यांच्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न दिले आहेत. मॅन इन्फ्रा कंस्ट्रक्शन (Man Infracontruction) राकेश झुनझुनवाला यांच्याकडे या इंजिनीअरिंग कंपनीचे 30 लाख शेअर्स आहेत. जे कंपनीच्या एकूण जारी केलेल्या इक्विटी शेअरच्या 1.21 टक्के आहेत. 2021 मध्ये, राकेश झुनझुनवाला यांचा हा स्टॉक 34.25 रुपयांवरुन 108 रुपये प्रति शेअरपर्यंत वाढला आहे आणि अशा प्रकारे या वर्षात सुमारे 215 टक्के रिटर्न या स्टॉकने दिले आहे. अनंत राज (Anant Raj) राकेश झुनझुनवाला पोर्टफोलिओमध्ये असलेला हा स्टॉक 2021 च्या मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे. वर्ष 2021 मध्ये या शेअरची किंमत 26.85 रुपयांवरून 70.70 रुपये झाली आहे. या कालावधीत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 165 टक्के रिटर्न्स दिले आहेत. झुनझुनवाला यांचे या कंपनीमध्ये 1 कोटी शेअर्स किंवा 3.39 टक्के हिस्सा आहे. Axis Bank ची धमाकेदार फेस्टिव्ह ऑफर! होम लोनवर 12 EMI ची सूट तर आणखीही बेनिफिट्स टाटा मोटर्स (Tata Motors) राकेश झुनझुनवाला यांचे टाटा मोटर्स कंपनीत सुमारे 3,77,50,000 शेअर्स किंवा 1.14 टक्के हिस्सा आहे. 2021 मध्ये टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत 290 रुपयांवरून 477 रुपये प्रति शेअर झाली आहे. या कालावधीत कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 155 टक्के रिटर्न्स दिले आहेत. टायटन कंपनी (Titan Company) राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला या दोघांची टाटा ग्रुपच्या टायटन या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. जून 2021 च्या तिमाहीपर्यंतच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे 3,30,10,395 शेअर्स आहेत, तर रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 96,40,575 शेअर्स आहेत. 2021 मध्ये टायटन कंपनीच्या शेअर्सची किंमत सुमारे 1560 रुपयांवरून 2485 रुपये प्रति शेअरपर्यंत वाढली. अशा प्रकारे या वर्षात कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 60 टक्के रिटर्न दिले आहेत. दिवाळीच्या काही दिवस आधी महागलं सोनं, वर्षाअखेर चांदी पोहोचणार 82,000 रुपयांवर? डेल्टा कॉर्प (Delta Corp) राकेश झुनझुनवाला यांच्या या शेअरची किंमत 2021 मध्ये सुमारे 162 रुपयांवरून 275 रुपये प्रति शेअर झाली. अशाप्रकारे कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीपासून सुमारे 70 टक्के रिटर्न्स गुंतवणूकदारांना दिले आहे. जून तिमाहीपर्यंत डेल्टा कॉर्पच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 1.15 कोटी शेअर्स किंवा कंपनीत 4.31 टक्के हिस्सा आहे. तर त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीमध्ये 85 लाख शेअर्स किंवा 3.19 टक्के हिस्सा आहे.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: