मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Share Market: सलग तिसऱ्या दिवशी कोसळलं शेअर मार्केट, मोठं कारण आलं समोर

Share Market: सलग तिसऱ्या दिवशी कोसळलं शेअर मार्केट, मोठं कारण आलं समोर

भारतातील शेअर बाजार कोसळण्याची ५ कारणं

भारतातील शेअर बाजार कोसळण्याची ५ कारणं

भारतातील शेअर बाजार कोसळण्याची ५ कारणं

  • Published by:  Kranti Kanetkar
मुंबई : भारतीय शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला आहे. शुक्रवारी, दुपारी 2:45 वाजता, निफ्टी 289 अंकांनी घसरून 17,340.05वर वधारली तर बीएसई सेन्सेक्स 985 अंकांनी घसरून 58,164.52 वर वधारला. देशांतर्गत आणि जागतिक घटकांचा भारतीय शेअर बाजारावर दबाव कायम असल्याने हा परिणाम दिसत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेतील वाढत्या व्याजदर आणि मंदीची तीव्र भीती यांचा भारतीय बाजारावर नकारात्मक परिणाम दिसत आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदारत वाढ केली. चीनमधील आर्थिक मंदीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा वेगही मंदावला. यामुळे भारतीय शेअर बाजारातही घसरण झाल. भारतातील शेअर बाजार कोसळण्याची ५ कारणं US फेडरल बँकेनं व्याजदरात वाढ केल्याने त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर झाला. नोव्हेंबर आणि डिझेंबरमध्ये पुन्हा व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या तिमाहीमध्ये अमेरिका आर्थिक मंदीचा सामना करू शकते असा अंदाज आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेवर त्याचा नकारात्मक परिणाम दिसून आला आहे. रेपो रेट वाढण्याची शक्यता भारतात महागाई दर वाढण्याची शक्यता आहे. चलनविषयक धोरण समितीच्या पुढील बैठकीत व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. डिसेंबरमध्येही RBI व्याजदरात 0.35 टक्क्यांनी वाढ करू शकते. पुढील वर्षी एप्रिलपर्यंत रेपो दर 6.75 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यामुळे शेअर बाजारावरील गुंतवणूकदारांचा विश्वासही डळमळीत झाला आहे. अॅडव्हान्स टॅक्स, डिपॉझिट सिस्टममधून पैसे काढणे, क्रेडिट डिमांट वाढणं अशा अनेक कारणांमुळे लिक्विडिटीमध्ये घट झाली आहे. त्याचा परिणामही बाजारपेठेवर पाहायला मिळत आहे. शेअरच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढवल्या आहेत. त्यामुळे बीएनबीने गुंतवणूकदारांना याबाबत चेतावनी दिली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेची धीम्या गतीने ग्रोथ पाहायला मिळत आहे. जूनच्या तिमाहीचे आकडे फार उत्साहजनक नाहीत. त्यामुळे देखील याचा बाजारपेठेवर परिणाम दिसून येत आहे.
First published:

Tags: Stock Markets

पुढील बातम्या