Home /News /money /

शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक; सेन्सेक्समध्ये 366 अंकांची तर निफ्टीत 128 अंकांची उसळी

शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक; सेन्सेक्समध्ये 366 अंकांची तर निफ्टीत 128 अंकांची उसळी

सेन्सेक्स 366.64 अंकांच्या म्हणजेच 0.64 टक्क्यांच्या वाढीसह 57,858.15 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 128.90 अंकांच्या किंवा 0.75 टक्क्यांच्या वाढीसह 17,278.00 वर बंद झाला.

  मुंबई, 25 जानेवारी : शेअर बाजारातील (Share Market Update) 5 दिवसांच्या जोरदार घसरणीला ब्रेक लागला आहे. आज बाजाराची सुरुवात गॅपडाऊनने झाली पण दिवसभरात बाजाराने खालच्या पातळीवरून चांगली रिकव्हरी दाखवली आणि शेवटी चांगल्या वाढीसह बाजार बंद झाला. आज निफ्टी (Nifty) खालच्या स्तरावरून 430 अंकांच्या करेक्शनसह बंद झाला. दुसरीकडे, सेन्सेक्स (Sensex) खालच्या पातळीवरून 1452 अंकांच्या करेक्शनसह बंद झाला. निफ्टी बँक (Bank Nifty) खालच्या पातळीवरून 1295 अंकांनी वधारत बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 366.64 अंकांच्या म्हणजेच 0.64 टक्क्यांच्या वाढीसह 57,858.15 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 128.90 अंकांच्या किंवा 0.75 टक्क्यांच्या वाढीसह 17,278.00 वर बंद झाला. आजच्या व्यवहारात आयटी, कन्झ्युमर ड्युरेबल वगळता सर्व क्षेत्रे तेजीत बंद झाली आहेत. ऑटो, बँकिंग, पॉवर, रियल्टी इंडेक्स सर्वाधिक वाढले आहेत. मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. बीएसई मिडकॅप शेअर 1.03 टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप 0.81 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. बँकेचे शेअर्स तेजीत निफ्टी बँक आज 2.05 टक्क्यांनी म्हणजेच 759.20 अंकांच्या वाढीसह 37706.80 वर बंद झाला. निर्देशांकांबद्दल बोलायचे झाल्यास, PSU बँकांमध्ये 4 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. यानंतर, ऑटो सेक्टर 2 टक्क्यांहून अधिक वाढले. मात्र आयटी निर्देशांक हिरव्या रंगात बंद होऊ शकला नाही. त्यात 0.33 टक्क्यांची घट नोंदवली गेली. Nifty 50 चे टॉप 5 गेनर
  • मारुती सुजुकी (Maruti Suzuki India) - 6.83 टक्के
  • अॅक्सिस बँक (Axis Bank Ltd.) - 6.76 टक्के
  • एसबीआई (SBI) - 4.15 टक्के
  • इंडसइंड बैंक (IndusInd Bank) - 3.88 टक्के
  • यूपीएस (UPL) - 3.74 टक्के
  Nifty 50 चे टॉप 5 लूजर
  • विप्रो (Wipro) - 1.75 टक्के
  • बजाज फिनसर्व (Bajaj Finserv Ltd) - 1.13 टक्के
  • टायटन कंपनी ( Titan Company) -1.10 टक्के
  • इंफोसिस (Infosys) -0.84 टक्के
  • टेक महिंद्रा (Tech Mahindra) - 0.83 टक्के
  Published by:Pravin Wakchoure
  First published:

  Tags: Investment, Money, Share market

  पुढील बातम्या