Home /News /money /

Share Market : 'हा' शेअर 30 रुपयांवरुन 748 रुपयांवर पोहोचला; आता गुंतवणूकदारांना मिळणार 600% डिविडंड

Share Market : 'हा' शेअर 30 रुपयांवरुन 748 रुपयांवर पोहोचला; आता गुंतवणूकदारांना मिळणार 600% डिविडंड

Tanla Platforms Ltd चे शेअर्स शुक्रवारी 748.50 रुपयांवर बंद झाले. शेअर मागील बंदच्या तुलनेत 2.29% खाली आला. गेल्या 5 वर्षांत स्टॉकच्या किंमतीवर नजर टाकल्यास किंमत 11 ऑगस्ट 2017 रोजी 30.30 रुपयांवरून 5 ऑगस्ट 2022 रोजी 748.50 रुपयांपर्यंत वाढली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 6 ऑगस्ट : शेअर बाजारात असे काही शेअर असतात जे गुंतवणूकदारांना मालामाल करतात. असाच एक शेअर आहे Tanla Platforms Ltd. ही कंपनी IT सॉफ्टवेअर उद्योगातील मिड-कॅप कंपनी असून तिचे मार्केट कॅप 10,187.02 कोटी आहे. कंपनी जगभरातील क्लाउड कम्युनिकेशन्स सोल्यूशन्सच्या सर्वात मोठ्या प्रोव्हाडर्सपैकी एक आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 2022-2023 या आर्थिक वर्षासाठी प्रति इक्विटी शेअर 6 रुपये लाभांश जाहीर केला आहे. यातील प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्व्यू 1 रुपये (600%) आहे. कंपनीच्या शेअरची नवीन किंमत 748.50 आहे. कंपनीने काय म्हटले? कंपनीच्या संचालक मंडळाने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये म्हटले की, कंपनीच्या संचालक मंडळाने गुरुवार, 04 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या बैठकीत, इतर गोष्टींबरोबरच, लाभांशावर चर्चा केली आणि घोषणा केली. 2022-23 आर्थिक वर्षासाठी 6 रुपये प्रति इक्विटी शेअर फेस वॅल्यू 1 रुपये (600%) अंतरिम लाभांशची घोषणा केली आहे. 19 ऑगस्ट 2022 रोजी अंतरिम लाभांशासाठी इक्विटी भागधारकांची नावे निश्चित करण्यासाठी रेकॉर्डची तारीख निश्चित केली आहे. चुकीच्या क्रेडिट स्कोअरमुळे कर्ज मिळत नसेल तर RBIकडे धाव घ्या; तुमची अडचण नक्की दूर होईल कंपनीच्या शेअरची किंमत Tanla Platforms Ltd चे शेअर्स शुक्रवारी 748.50 रुपयांवर बंद झाले. शेअर मागील बंदच्या तुलनेत 2.29% खाली आला. गेल्या 5 वर्षांत स्टॉकच्या किंमतीवर नजर टाकल्यास किंमत 11 ऑगस्ट 2017 रोजी 30.30 रुपयांवरून 5 ऑगस्ट 2022 रोजी 748.50 रुपयांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच या कालावधीत गुंतवणूकदारांना 2,370.30% इतका मोठा मल्टीबॅगर परतावा मिळाला आहे. चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला, कर्जाच्या कचाट्यात अडकलात? मिळवा 'अशी' मुक्तता मात्र गेल्या 1 वर्षात स्टॉक 18.73% घसरला आहे आणि YTD आधारावर 2022 मध्ये आतापर्यंत स्टॉक 59.30% खाली आहे. गेल्या 6 महिन्यांत स्टॉक 55.94% आणि गेल्या 1 महिन्यात 24.46% घसरला आहे. NSE वर, स्टॉकने 17 जानेवारी रोजी 2,096.75 च्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर आणि 27 जुलै रोजी 584.50 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. म्हणजेच, 52 आठवड्यांच्या उच्चांकावरुन शेअर 64.30 टक्के खाली आणि 52 आठवड्याच्या लो लेव्हलपेक्षा 28.05% वर शेअर ट्रे़ड करत आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या