Home /News /money /

शेअर बाजार चढ-उतारादरम्यान हिरव्या चिन्हात बंद, बँकांच्या शेअरमध्ये घसरण

शेअर बाजार चढ-उतारादरम्यान हिरव्या चिन्हात बंद, बँकांच्या शेअरमध्ये घसरण

वीकली एक्सपायरीच्या दिवशी शेवटी सेन्सेक्स 157.45 अंकांच्या म्हणजेच 0.27 टक्क्यांच्या वाढीसह 58,807.13 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 47.10 अंकांच्या किंवा 0.27 टक्क्यांच्या वाढीसह 17,516.85 वर बंद झाला.

    मुंबई 9 डिसेंबर : भारतीय शेअर बाजार आज गुरुवारी चढ उतारादरम्यान हिरव्या चिन्हात बंद झाला. वीकली एक्स्पायरीच्या (Weekly Expiry) दिवशी आजच्या ट्रेडिंगमध्ये मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. दुसरीकडे FMCG, Consumer Goods च्या शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. Oil and Gas, Metal शेअर्समध्ये किंचित वाढ झाली. त्याचबरोबर Bank, Realty, IT शेअर्सवर दबाव दिसून आला. वीकली एक्सपायरीच्या दिवशी शेवटी सेन्सेक्स 157.45 अंकांच्या म्हणजेच 0.27 टक्क्यांच्या वाढीसह 58,807.13 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 47.10 अंकांच्या किंवा 0.27 टक्क्यांच्या वाढीसह 17,516.85 वर बंद झाला. ITC, L & T, Asian Paints, UPL आणि Reliane Industries हे शेअर निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले तर HDFC Bank, Titan Company, Nestle India, NTPC आणि PowerGrid Corporation सर्वाधिक तोट्यात होते. तुमचे पैसे 'या' अ‍ॅपमध्ये गुंतवा; बँक, पोस्टापेक्षा जास्त 12 टक्के व्याज मिळेल अन् कर्जही घेता येईल फूडसंबधी स्टॉक्समध्ये वाढ दिवसभराच्या व्यवहारात आज बाजारात खाण्यापिण्याशी संबंधित शेअर्समध्ये वाढ झाली. देवयानी आणि बर्गर किंगच्या शेअर्समध्ये 7 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. दुसरीकडे, बॉब्रेक्यू नेशन आणि सफायर फूडमध्ये चांगली खरेदी दिसून आली आहे. मागील दोन वर्षांतील इंडियन फूड सर्विस इंडस्ट्रीचा प्रवास पाहिला तर तो रोलर कोस्टर राईडसारखा राहिला आहे. कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनने या संपूर्ण उद्योगाला हादरवून सोडले, त्यामुळे रेस्टॉरंट क्षेत्राशी संबंधित कंपन्यांना सुरुवातीच्या काही महिन्यांत मोठा तोटा सहन करावा लागला. यानंतर आता या उद्योगात तेजी पाहायला मिळत आहे. Radhe Developers शेअरमुळे गुंंतवणूकदार मालामाल! सहा महिन्यात स्टॉकमध्ये 3150 टक्क्यांची वाढ PayTM वर ब्रोकरेजचे मत MACQUARIE ने PAYTM वर अंडरपरफॉर्म रेट केले आहे आणि स्टॉकसाठी 1200 रुपयांचे टार्गेट दिले आहे. त्यांचं मत आहे की आरबीआय डिजिटल पेमेंट शुल्कावर डिस्कशन पेपर आणेल. त्यानंतर PPI आणि Wallets चे शुल्क कमी केले जाऊ शकतात. शुल्कात कपात केल्याने फिनटेक कंपन्यांचे आव्हान वाढणार आहे. त्याच वेळी, शुल्कांच्या मर्यादेमुळे कंपनीवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या