Home /News /money /

Share market Update : प्रचंड अस्थिरतेदरम्यान सेन्सेक्समध्ये 581 अंकांची घसरण, तर निफ्टी 17,200 च्या खाली बंद

Share market Update : प्रचंड अस्थिरतेदरम्यान सेन्सेक्समध्ये 581 अंकांची घसरण, तर निफ्टी 17,200 च्या खाली बंद

सेन्सेक्स (Sensex) आज 581.21 अंकांनी म्हणजेच 1 टक्क्यांनी घसरून 57276.94 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) 167.80 अंकांनी म्हणजे 0.97 टक्क्यांनी घसरून 17110.15 अंकांवर बंद झाला.

    मुंबई, 27 जानेवारी : यूएस फेडने मार्चमध्ये व्याजदरात वाढ केल्याच्या संकेतावर आज भारतीय बाजारांची सुरुवात मोठ्या घसरणीने झाली, परंतु व्यवहाराच्या दिवसात बाजारात खालच्या स्तरावरून रिकव्हरी पाहायला मिळाली आणि निफ्टी 250 अंकांच्या सुधारणासह बंद झाला. निफ्टी बँक खालच्या स्तरावरून 1050 अंकांच्या करेक्सनसह बंद झाला. दिवसभर प्रचंड अस्थिरता असताना सेन्सेक्स-निफ्टी व्यवहाराच्या शेवटी लाल चिन्हात बंद झाले. आजच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो शेअरमध्ये खरेदी दिसून आली, तर आयटी, फार्मा, कन्झुमर ड्युरेबल्स शेअरमध्ये विक्री दिसून आली. शेअर बाजारात आज पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. मंगळवारी पाच दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागला होता, मात्र आज पुन्हा एकदा शेअर बाजार लाल रंगात बंद झाला. सेन्सेक्स (Sensex) आज 581.21 अंकांनी म्हणजेच 1 टक्क्यांनी घसरून 57276.94 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) 167.80 अंकांनी म्हणजे 0.97 टक्क्यांनी घसरून 17110.15 अंकांवर बंद झाला. मुंबईत Google आणि CEO सुंदर पिचाईंविरोधात गुन्हा दाखल, वाचा काय आहे प्रकरण टॉप गेनल आणि टॉप लूजर शेअर गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये HCL Technologies, Tech Mahindra, Dr Reddy’s Laboratories, TCS आणि Wipro निफ्टीचे टॉप लूजर ठरले. तर Axis Bank, SBI, Maruti Suzuki, Cipla आणि  Kotak Mahindra Bank टॉप गेनर ठरले. आता Tata Sky चं झालं नामांतर; नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइमसह प्लानमध्ये मिळणार 'या' 13 OTT सेवा टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण शेअर बाजारात, अनेक नव्या युगातील टेक कंपन्यांच्या शेअरमध्ये गेल्या काही काळापासून मोठी घसरण पाहायला मिळत आहे. या घसरणीचा परिणाम आता अनलिस्टेड मार्केटमध्ये किंवा ग्रे मार्केटमध्येही दिसून येत आहे. शेअर बाजाराबरोबरच अनलिस्टेड मार्केटपासून गुंतवणूकदार दूर होत आहेत. येत्या काही दिवसांत अनेक कंपन्या बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत असल्याचे डीलर्सचे म्हणणे आहे. असे असूनही, अनलिस्टेड बाजारात या शेअर्सच्या व्यापाराच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे, जी गुंतवणूकदारांची कमी होत चाललेली स्वारस्य दर्शवते.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Money, Share market

    पुढील बातम्या