मुंबई, 8 डिसेंबर : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी तेजी पाहायला मिळाली. आरबीआयने दर न बदलल्यामुळे बाजारात उत्साह होता आणि बाजार दिवसाच्या उच्चांकावर बंद झाला. ट्रेडिंगच्या शेवटी, सेन्सेक्स (Sensex) 1016.03 अंकांच्या किंवा 1.76 टक्क्यांच्या वाढीसह 58,649.68 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी (Nifty)293.10 अंक किंवा 1.71 टक्क्यांच्या वाढीसह 17,469.80 वर बंद झाला.
आजच्या ट्रेडिंग सत्रात Bajaj Finance, Hindalco Industries, Maruti Suzuki, SBI आणि Bajaj Finserv निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले तर HDFC Life, Kotak Mahindra Bank, Powergrid, Device Labs आणि IOC निफ्टीत टॉप लूझरमध्ये होते.
आजच्या ट्रेडिंग सत्रात सर्व सेक्टोरल इंडेक्स हिरव्या रंगात बंद झाले. PSU बँक, ऑटो, II इंडेक्स सुमारे 2 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. बीएसई मिड आणि स्मॉलकॅप इंडेक्स 1 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले.
तुमच्या खिशातली 500 रुपयांची 'ती' नोट खोटी आहे? तथ्य जाणून घ्या
रेपो रेटमध्ये बदल नाही
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजदरात कोणताही बदल (RBI Monetary Policy Live Updates) केला नाही आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक धोरण समितीच्या (RBI MPC) झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das) यांनी दिलेल्या माहितीनुसार रेपो रेट (Repo Rate unchanged at 4%) 4 टक्क्यांवर स्थिर राहणार आहे. तर रिव्हर्स रेपो रेट 3.35% वर कायम राहील. शक्तिकांत दास यांनी दिलेल्या माहितनुसार एमपीसीने सर्वानुमते हा निर्णय घेतला आहे.
दोन हजाराच्या नोटा बाजारात कमी का झाल्या? अखेर केंद्र सरकारने खरं कारण सांगितलं
मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या 6 सदस्यांपैकी 5 सदस्यांनी पॉलिसी रेट सध्याच्या पातळीवर ठेवण्यास पाठिंबा दिला होता. शक्तिकांत दास म्हणाले की मार्जिनल स्टॅडिंग फॅसिलिटी देखील पूर्वीप्रमाणे 4.25% आहे. RBI ने 2021-22 साठी CPI महागाईचा अंदाज 5.3% वर कायम ठेवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Share market