Home /News /money /

शेअर बाजारातील पडझडीदरम्यान टॉप पिक्स, या शेअर्समध्ये 3-4 आठवड्यात चांगल्या कमाईची संधी

शेअर बाजारातील पडझडीदरम्यान टॉप पिक्स, या शेअर्समध्ये 3-4 आठवड्यात चांगल्या कमाईची संधी

आजच्या व्यवहारावर नजर टाकली असता सलग पाचव्या दिवशी बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. निफ्टी सुमारे 236.10 अंकांनी घसरून 17400 च्या खाली घसरला आहे. Infosys, Bajaj Finance आणि HDFC सारख्या हेवीवेट्स बाजारावर दबाव आणत आहेत.

    मुंबई, 24 जानेवारी : वाढती महागाई, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, यूएस बॉन्ड यील्डच्या आणि एफआयआयची विक्री यामुळे गेल्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी 3.5 टक्क्यांपर्यंत घसरले. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आगमनापूर्वी ट्रेडर्स सावध दिसत आहेत. गेल्या आठवड्यात, निफ्टी 600 अंकांहून अधिक खाली आला आता शुक्रवारी 17617 स्तरावर बंद झाला. एनर्जी वगळता, शेवटच्या ट्रेडिंग दिवशी जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये घसरण झाली. निफ्टी डेली चार्टवर एक मोठी बियरिश कँडल तयार होताना दिसला. यावेळी बाजारात कमकुवतपणाचे ट्रेंड दिसून येत आहेत. आजच्या व्यवहारावर नजर टाकली असता सलग पाचव्या दिवशी बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. निफ्टी सुमारे 236.10 अंकांनी घसरून 17400 च्या खाली घसरला आहे. Infosys, Bajaj Finance आणि HDFC सारख्या हेवीवेट्स बाजारावर दबाव आणत आहेत. हेवीवेट्सप्रमाणेच मिडकॅप शेअर्समध्येही दबाव आहे. मिडकॅप इंडेक्स जवळपास 2.75 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, निफ्टी बँकेवर निफ्टीपेक्षा कमी दबाव दिसत आहे. बाजारातील सर्वांगीण विक्रीमुळे निफ्टी मेटल (Nifty Metal), आयटी (IT) आणि रिअल्टी (Realty) इंडेक्स 2 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. दुसरीकडे, ऑटो, एनबीएफसी इंडेक्सवरही खूप दबाव आहे. 5paisa,com चे रुचित जैन म्हणतात की या आठवड्यात निफ्टीसाठी 17500 ची पातळी खूप महत्त्वाची असेल. यावर निफ्टीला सपोर्ट आहे. जर निफ्टी 17700 च्या वर जाताना दिसत असेल तर पुन्हा एकदा बाजारात खरेदी दिसून येईल आणि निफ्टी पुन्हा एकदा 17900-18000 च्या दिशेने जाताना दिसेल. ते पुढे म्हणाले की गेल्या आठवड्यातील घसरण ही सौम्य आणि अल्पकालीन घसरण होती. आता अर्थसंकल्पापूर्वी बाजारात पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळणार आहे. Paytm, Zomato शेअर्समध्ये मोठी घसरण, लिस्टिंगनंतरच्या नीच्चांकी पातळीवर, काय आहे कारण? तज्ज्ञांनी सुचवलेले आजचे टॉप ट्रेडिंग स्टॉक, जे पुढील 3-4 आठवड्यांमध्ये मजबूत कमाई करू शकतात. नागराज शेट्टी यांचे टॉप पिक्स Linde India : BUY | LTP: 2,774.35 रुपये या शेअरमध्ये 2630 रुपयांच्या स्टॉप लॉससह खरेदीचा सल्ला आहे आणि 3,065 रुपयांचे टार्गेट आहे. हा स्टॉक 3-4 आठवड्यात 10 टक्के परतावा देऊ शकतो. CCL Products India: BUY | LTP: 460.9 रुपये या शेअरमध्ये 430 रुपयांच्या स्टॉप लॉससह खरेदीचा सल्ला आहे आणि 515 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. या स्टॉकमध्ये 3-4 आठवड्यांत 12 टक्के परतावा मिळू शकतो. Biocon: BUY | LTP: 377.1 रुपये या शेअरमध्ये 350 रुपयाच्या स्टॉप लॉससह खरेदी सल्ला आहे आणि 417 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. या स्टॉकमध्ये 3-4 आठवड्यांत 11 टक्के परतावा मिळू शकतो. 5paisa.com च्या रुचित जैन यांचे टॉप पिक्स Hindustan Unilever : BUY | LTP: 2325.4 रुपये या शेअरमध्ये 2250 रुपयांच्या स्टॉप लॉससह खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे. तर 2440 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. या शेअरमध्ये 3-4 आठवड्यांत 5 टक्के परतावा मिळू शकतो. Bharat Dynamics: BUY | LTP: 459.1 रुपये या शेअरमध्ये 435 रुपयांच्या स्टॉप लॉससह 500 रुपयांच्या टार्गेटसाठी खरेदीचा सल्ला आहे. या स्टॉकमध्ये 3-4 आठवड्यांत 9 टक्के परतावा मिळू शकतो. Hitachi Energy India: BUY | LTP: 3030.75 रुपये या शेअरमध्ये 2750 च्या स्टॉप लॉससह 3,450 च्या टार्गेटसाठी खरेदीचा सल्ला आहे. या स्टॉकमध्ये 3-4 आठवड्यांत 14 टक्के परतावा मिळू शकतो. PM Shram Yogi MaanDhan Yojana: मजुरांना मिळणार 3000 रुपये पेन्शन, कुठे आणि कसा फॉर्म भरायचा? Angel One च्या समीत चव्हाण यांचे टॉप पिक्स Time Technoplast : BUY | LTP: 86.20 रुपये या शेअरमध्ये 77.90 रुपयांच्या स्टॉप लॉससह 102 रुपयांचे टार्गेट ठेवून खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे. हा स्टॉक 3-4 आठवड्यात 18.3 टक्के परतावा पाहू शकतो. Kotak Securities च्या श्रीकांत चौहान यांचे शॉर्ट ट्रेडिंग पिक्स Tech Mahindra : BUY | LTP: 1,593.55 रुपये टेक महिंद्रामध्ये 1480 रुपयांच्या स्टॉपलॉससह 1690-1770 रुपयांच्या टार्गेटसाठी खरेदीचा सल्ला आहे. 3-4 आठवड्यांत हा स्टॉक 6-11 टक्के परतावा देऊ शकतो. TATA Power: BUY | LTP: 241.95 रुपये या शेअरमध्ये 225 रुपयांच्या स्टॉप लॉससह 268-287 रुपयांच्या टार्गेटारसाठी खरेदीचा सल्ला आहे. 3-4 आठवड्यांत हा स्टॉक 11-19 टक्के परतावा देऊ शकतो. IRB Infrastructure Service: BUY | LTP: 232.60 रुपये IRB Infra मध्ये 263-290 च्या टार्गेटसाठी 210 रुपयांच्या स्टॉपलॉससह खरेदीचा सल्ला आहे. हा स्टॉक 3-4 आठवड्यांत 13-25 टक्के परतावा देऊ शकतो.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या