Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Hot Stocks : 'या' स्टॉक्समध्ये गुंतवणूक करुन 2-3 आठवड्यात कमाईची संधी

Hot Stocks : 'या' स्टॉक्समध्ये गुंतवणूक करुन 2-3 आठवड्यात कमाईची संधी

HDFC Securities चे नंदिश शाह यांनी ट्रेडर्सना निवडक स्मॉल-मिड कॅप शेअर्समध्ये शॉर्ट टर्म स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ट्रेडर्सनी Pharma, FMCG, Auto आणि Hotels स्टॉकवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 16 नोव्हेंबर : शेअर बाजारात गुंतवणूक करताना काळजीपूर्वक आणि अभ्यास करुन स्टॉकची निवड करावी लागते. त्यामुळेच अनेक किरकोळ गुंतवणूकदार तज्ज्ञांच्या सल्लाकडे लक्ष देतात. HDFC Securities चे नंदिश शाह यांनी देखील आज काही गोष्टी सुचवल्या आहेत. ऑक्टोबरच्या उत्तरार्धात तीव्र घसरणीनंतर, निफ्टी मिड आणि स्मॉलकॅप निर्देशांक काही दिवस लहान श्रेणीत ट्रेड करताना दिसत आहेत. 15 नोव्हेंबर रोजी, मिड आणि कॅप सेगमेंटमधील घसरलेल्या शेअर्सची संख्या वाढत्या शेअर्सपेक्षा अधिक आहे. याशिवाय 52 विक हायचा न्यू हाय स्थापित करणार्‍या शेअर्सच्या संख्येतही गेल्या काही दिवसांपासून घट झाली आहे. याचा अर्थ मिड आणि स्मॉलकॅप सेगमेंटमधील काही निवडक शेअर खरेदी केले जात आहेत.

या गोष्टी लक्षात घेऊन HDFC Securities चे नंदिश शाह यांनी ट्रेडर्सना निवडक स्मॉल-मिड कॅप शेअर्समध्ये शॉर्ट टर्म स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ट्रेडर्सनी Pharma, FMCG, Auto आणि Hotels स्टॉकवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. शॉर्ट टर्मसाठी निफ्टी सकारात्मक राहील. निफ्टीचे पुढील लक्ष्य 18,350 आणि नंतर 18600 असू शकते. निफ्टीत लाँग पोझिशनसाठी 17780 चा स्टॉप लॉस ठेवावा.

Digital Gold बाबत मोठ्या निर्णयाच्या विचारात सरकार, SEBI आणि RBI आखत आहेत योजना

3 स्टॉक जे 2-3 आठवड्यांत चांगली कमाई करू शकतात

Lemon Tree Hotels: BUY | LTP: 56.9 रुपये

या शेअर्ससाठी 63 रुपयांच्या टार्गेटसाठी 54 चा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हा स्टॉक 2-3 आठवड्यात 11 टक्के परतावा देऊ शकतो.

PM KISAN मध्येही होतोय घोटाळा! 'या' शेतकऱ्यांकडून सरकार वसूल करणार पैसे

Minda Corporation: BUY | LTP: 176.85 रुपये

या शेअरसाठी 165 रुपयांच्या स्टॉप लॉससह 200 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. हा स्टॉक 2-3 आठवड्यात 13 टक्के परतावा देऊ शकतो.

Tata Consumer Products : BUY | LTP: 852.55 रुपये

या शेअरमध्ये खरेदी देण्यात आला असून यात 815 रुपयांच्या स्टॉप लॉससह 920 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. हा स्टॉक 2-3 आठवड्यात 8 टक्के परतावा देऊ शकतो.

First published:

Tags: Investment, Money, Share market