मुंबई, 20 नोव्हेंबर : भारतीय शेअर बाजारात (Share Market) विक्रीचा कल सोमवारीही कायम राहिला. यामुळे सोमवारी SENSEX 1200 अंकांपेक्षा अधिक घसरून 58,362 वर आणि निफ्टी जवळपास 400 अंकांनी घसरून 17,365.00 वर आला आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर सेन्सेक्स 59000 च्या खाली आला आहे. सेन्सेक्स 1170.12 अंकांनी किंवा 1.96 टक्क्यांनी घसरून 58,465.89 वर बंद झाला. तर निफ्टी 348.55 अंकांनी घसरून 17,416.55 वर बंद झाला.
मिडकॅप, स्मॉलकॅपची (Midcap, Smallcap Index) अवस्था तर आणखी वाईट आहे. निफ्टी हाय लेव्हलहून 6.4 टक्के खाली आला आहे. तर मिडकॅप, स्मॉलकॅप शेअरर्समध्ये अधिकच तेजी पाहायला मिळत आहे. मेटल, एफएमसीजी, फायनान्स शेअर्स (Meatl, FMCG, Finance Share) अधिक घसरले आहेत. जर निर्देशांक पाहिला तर निफ्टी 50 मध्ये 6.4 टक्क्यांची घसरण आली आहे. दुसरीकडे, निफ्टी बँकेत 11.5 टक्के घसरण झाली तर निफ्टी मिडकॅप 100 या घसरणीत 8.7 टक्के आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 मध्ये 9.7 टक्के घसरण झाली.
Paytm Share आज पुन्हा 15 टक्क्यांपर्यंत गडगडले; विजय शर्मांच्या संपत्तीत 78.10 कोटी डॉलर्सची घट
शेअर बाजारात घसरण का?
बेंचमार्क इंडेक्स आणि कमकुवत जागतिक संकेत तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने भारतीय बाजारात घसरण झाली. याशिवाय, युरोपमधील अनेक भागांमध्ये कोरोनाच्या केसेसमध्ये वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा मूड देखील खराब दिसत आहे.
नोकरी बदलताना PF अकाऊंट ट्र्रान्सफर करण्याची गरज नाही, EPFO चा निर्णय
सर्व सेक्टर लाल रंगात
सर्व सेक्टरमध्ये सुरु असलेले घसरण पाहता आज शेअर बाजार लाल चिन्हात बंद झाला आहे. ऑटो, पीएसयू बँक, ऑइल अँड गॅस, रियल्टी इत्यादी क्षेत्रांमध्ये 1 ते 2 टक्क्यांनी घसरण झाली आहे. एअरटेलने टेरिफ वाढवल्यामुळे टेलिकॉम शेअर्स आज वधारलेले दिसले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) व्यतिरिक्त, मारुती, बजाज फायनान्स, कोटक बँक आणि बजाज फिनसर्व्ह देखील लाल रंगात होते. दुसरीकडे, भारती एअरटेल, पॉवरग्रिड, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक आणि आयटीसी वाढीसह ट्रेड करत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Share market