Home /News /money /

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही खास बातमी; गुंतवणुकीसाठीची सोपे मार्ग; वाचा संपूर्ण माहिती

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही खास बातमी; गुंतवणुकीसाठीची सोपे मार्ग; वाचा संपूर्ण माहिती

शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सहज व सोपा पर्याय कोणता, याचा अनेकजण शोध घेताना दिसतात. त्यामुळेच विविध कंपन्यांकडून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आणल्या जातात.

नवी दिल्ली, 18 डिसेंबर:  भारतीय शेअर बाजारात ( Indian stock markets ) गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. आजकाल शेअर बाजाराची स्थिती चांगली नसली तरी आज ना उद्या शेअर बाजाराची स्थिती सुधारेल, असे अनेक गुंतवणूकदारांना ( Investors ) वाटत आहे. तसेच शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सहज व सोपा पर्याय कोणता, याचा अनेकजण शोध घेताना दिसतात. त्यामुळेच विविध कंपन्यांकडून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आणल्या जातात. अशीच एक पद्धत म्हणजे स्मॉलकेस ( smallcase ). टीव्ही 9 हिंदी ने याबाबत वृत्त दिले आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीचे नवनवीन मार्ग उदयास येत आहेत. नवीन पद्धतींपैकी एक म्हणजे स्मॉलकेस. ही कंपनी 2015 मध्ये आयआयटीच्या (IIT) तीन विद्यार्थ्यांनी सुरू केली होती. या कंपनीने आज देशातील जवळपास सर्व शेअर ब्रोकरशी करार केले आहेत. गेल्या तीन वर्षांत कंपनीच्या व्यवहाराचे प्रमाण 300 पटीने वाढले आहे. चला तर मग स्मॉलकेस म्हणजे काय आणि ती काय करते, हे सोप्या भाषेत समजून घेऊ. हेही वाचा-  Multibagger Stock : 'या' स्टॉकमुळे गुंतवणूकदारांना बंपर कमाई; 2 रुपयांचा स्टॉक 195 रुपयांवर
 स्मॉलकेस हा एक पोर्टफोलिओ ( portfolio ) आहे, जो थीम किंवा धोरणासाठी तयार केला जातो. आणि गुंतवणूकदार त्यांच्या ब्रोकर आणि डीमॅट खात्याद्वारे थेट त्यात गुंतवणूक करू शकतात. यामध्ये गुंतवणूकदाराने नवीन काही करण्याची गरज नाही. यामध्ये गुंतवणूकदाराला Smallcase.com वर जावे लागेल, आणि त्याच्या ब्रोकिंग अकाऊंटद्वारे लॉग इन करावं लागेल. उदाहरणार्थ, जर तुमचे एचडीएफसी सिक्युरिटीजमध्ये डी मॅट खातं असेल, तर तुम्ही त्या लॉगिनद्वारेही येथे लॉग इन करू शकता.
पाहिजे तेव्हा काढता येतात पैसे या प्लॅटफॉर्मवर, तुम्हाला वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ खरेदी करण्याची संधी मिळते. 120 पेक्षा जास्त व्यवस्थापकांच्या अनुभवाचा फायदा होतो. 25 ते 35 वयोगटातील तरुणांमध्ये स्मॉलकेस खूप लोकप्रिय आहे. या प्लॅटफॉर्मवर प्रत्येक पोर्टफोलिओसाठी किमान गुंतवणूक रक्कम निश्चित केली आहे. ती गुंतवणूकदार प्लॅटफॉर्मवर अगोदरदेखील पाहू शकतात. पोर्टफोलिओ 100 रुपयांपासून सुरू होतो आणि 70-80 हजार रुपयांपर्यंत देखील जातो. अनेक पोर्टफोलिओंमध्ये, गुंतवणूकदारांना एकरकमी रक्कम गुंतवण्याचा पर्यायदेखील मिळतो. तुम्हाला दोन्ही पर्याय मिळतात, तुम्ही एकरकमी पैसे देखील टाकू शकता आणि पद्धतशीर गुंतवणूकदेखील करू शकता. याशिवाय त्यात लॉक-इन नाही. त्यामुळे गुंतवणूकदार त्यांना पाहिजे तेव्हा पैसे काढू शकतात. गुंतवणूक कशी कराल? लॉगिन केल्यानंतर, तुम्हाला प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे पोर्टफोलिओ पाहायला मिळतील. त्यांना स्मॉलकेस म्हणतात. हे पोर्टफोलिओ वेगवेगळ्या थीमवर आधारित आहेत. त्यामुळे, तुम्ही तुमच्या आवडीच्या पोर्टफोलिओमध्ये थेट गुंतवणूक करू शकता. ज्या पद्धतीने तुम्ही शेअर्स खरेदी करता, त्या पद्धतीनेच तुम्ही यात थेट गुंतवणूकदेखील करू शकता. हा प्लॅटफॉर्म वापरण्यास अतिशय सोपा आहे. हा प्रकार म्युच्युअल फंड आणि शेअर्स खरेदी करण्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. थीमवर आधारित तुम्हाला यात शेअर्स किंवा ईटीएफची बास्केट खरेदी करता येते. तुम्ही कोणत्याही थीमवर आधारित बास्केट तयार करू शकता. थीमवर आधारित या बास्केटमध्ये 2 ते 50 शेअर्स असू शकतात. हेही वाचा-  कामाची बातमी! आता मोफत बदलून घ्या फाटलेल्या नोटा; परत मिळतील पूर्ण पैसे, जाणून घ्या प्रक्रिया
 कोरोनामुळे रोजगार गेल्याने अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. रोजगार मिळू लागल्यामुळे अनेकजण पैसे गुंतवणुकीचे मार्गही शोधत आहेत.शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवण्याची सोपी पद्धत कोणती, याचाही शोध घेतला जात आहे. अशा लोकांसाठी स्मॉलकेस हा चांगला पर्याय ठरू शकतो.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Investment, Share market

पुढील बातम्या