मराठी बातम्या /बातम्या /मनी /

शेअर बाजारात आज दीर्घ सुट्टीनंतर तेजीची शक्यता, जगभरातील बाजारांचा प्रभाव पडणार?

शेअर बाजारात आज दीर्घ सुट्टीनंतर तेजीची शक्यता, जगभरातील बाजारांचा प्रभाव पडणार?

Share Market Update: मागील सत्रात सेन्सेक्स 130 अंकांच्या वाढीसह 59,463 वर बंद झाला, तर निफ्टीने 39 अंकांची उसळी घेत 17,698 वर पोहोचला. गेल्या आठवड्यात दोन्ही निर्देशांकांमध्ये सुमारे 1.7 टक्क्यांची मोठी वाढ झाली होती.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 16 ऑगस्ट : तीन दिवसांच्या सुट्टीनंतर भारतीय शेअर बाजारात आज मोठी तेजी दिसण्याच्या शक्यता आहे. गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांनी प्रचंड उत्साह दाखवला आणि सेन्सेक्स पुन्हा एकदा 60 हजारांच्या दिशेने वाटचाल करत आहे. मागील सत्रात सेन्सेक्स 130 अंकांच्या वाढीसह 59,463 वर बंद झाला, तर निफ्टीने 39 अंकांची उसळी घेत 17,698 वर पोहोचला. गेल्या आठवड्यात दोन्ही निर्देशांकांमध्ये सुमारे 1.7 टक्क्यांची मोठी वाढ झाली होती. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आजही शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची भावना सकारात्मक दिसत असून जागतिक बाजारातून मिळालेल्या पाठिंब्यामुळे गुंतवणूकदार पुन्हा खरेदीकडे जाऊ शकतात. अमेरिकन बाजारात तेजी अॅपल, मायक्रोसॉफ्ट आणि टेस्ला यांसारख्या दिग्गज कंपन्यांच्या शेअर्सच्या वाढीमुळे अमेरिकन बाजारातील शेवटचे सत्र अतिशय तेजीचे ठरले. डाऊ जोन्स 151.39 अंक किंवा 0.45% वाढला, तर S&P 500 16.99 अंकांनी किंवा 0.40% वाढला. त्याचप्रमाणे नॅस्डॅक कंपोझिट देखील 80.87 अंकांनी किंवा 0.62% वाढण्यात यशस्वी झाला. टाटा समूहाच्या 'या' शेअरमुळे काही गुंतवणूकदार मालामाल तर काहींचं मोठं नुकसान, वर्षभरात नेमकं काय घडलं? युरोपीय बाजारही तेजीत अमेरिकेच्या धर्तीवर युरोपीय बाजारातही शेवटच्या ट्रेडिंग सत्रात वाढ दिसून आली. युरोपातील प्रमुख स्टॉक एक्स्चेंजमध्ये समाविष्ट असलेल्या जर्मनीच्या स्टॉक एक्स्चेंजने 0.15 टक्क्यांची झेप दाखवली, तर फ्रेंच शेअर बाजार 0.25 टक्क्यांनी वधारला. याशिवाय लंडन स्टॉक एक्स्चेंजही शेवटच्या ट्रेडिंग सत्रात 0.11 टक्क्यांनी वधारला.

स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी SBI ची खास योजना, फिक्स डिपॉझिटवर मिळणार अधिक व्याजदर

आशियाई बाजार देखील पॉझिटिव्ह आशियातील बहुतांश शेअर बाजार आज सकाळी वाढीने उघडले आणि हिरव्या चिन्हावर व्यवहार करत आहेत. आज सकाळी सिंगापूर स्टॉक एक्स्चेंजमध्ये 0.34 टक्क्यांची उसळी दिसत आहे, परंतु जपानचा निक्केई 0.03 टक्क्यांच्या किंचित घसरणीने व्यवहार करत आहे. हाँगकाँगचा शेअर बाजार 0.41 टक्क्यांनी वधारला आहे, तर तैवानचा शेअर बाजारही 0.17 टक्क्यांनी उसळी दाखवत आहे. याशिवाय दक्षिण कोरियाचा कॉस्पी 0.37 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. चीनचा शांघाय कंपोझिट 0.40 टक्क्यांनी वधारत आहे.
First published:

Tags: Investment, Money, Share market

पुढील बातम्या