या वर्षाच्या सर्वात मोठ्या घसरणीनं शेअर बाजार बंद, गुंतवणूकदारांचं झालं 'इतकं' नुकसान

या वर्षाच्या सर्वात मोठ्या घसरणीनं शेअर बाजार बंद, गुंतवणूकदारांचं झालं 'इतकं' नुकसान

बँकिंग शेअर्सच्या चहूबाजूंनी विक्रीमुळे शेवटी सेन्सेक्स 553.82 अंकांवर घसरण होऊन 38592.72 अंकांवर बंद झाला.

  • Share this:

मुंबई, 06 जून : RBI क्रेडिट पाॅलिसीच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. बँकिंग शेअर्सच्या चहूबाजूंनी विक्रीमुळे शेवटी सेन्सेक्स 553.82 अंकांवर घसरण होऊन 38592.72 अंकांवर बंद झाला. निफ्टी 177.90 अंकांवर घसरण होऊन  11843वर बंद झाला. या वर्षी पहिल्यांदा सेन्सेक्स आणि निफ्टी इतकी घसरण होऊन बंद झाले. यामुळे गुंतवणूकदारांचे 2.19 लाख रुपये बुडाले. भांडवली वस्तू, आॅटो, सिमेंटसारख्या क्षेत्रात जास्त घसरण पाहायला मिळाली.

तज्ज्ञांच्या मते बाजारात सगळ्या बाजूंनी विक्री झाल्यानं सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार घसरण झाली. सोबत DHFL चे बाँड डिफाॅल्ट झाल्यानंतर इतर एनबीएफसीबद्दल चिंता वाढलीय. असं म्हणतायत एनबीएफसी कंपन्या डिफाॅल्ट करू शकतात.

लवकरच किराणा मालाच्या दुकानात ATM कार्ड वापरून काढता येतील पैसे

RBI ची मोठी घोषणा, ग्राहकांना आता द्यावे नाही लागणार बँकेचे 'हे' दर

गुंतवणूकदारांचे बुडाले 2.19 लाख रुपये

बाजारात घसरण झाल्यानं बीएसईचा एकूण मार्केट कॅपिटलायझेशन 1,53,20,367.21  कोटी रुपये राहिलं. एक दिवस आधी मार्केट कॅप 1,55,41,431.31 कोटी रुपये होतं. म्हणजे गुंतवणूकदारांचे 2.19 लाख रुपये बुडाले.

RBI नं केली रेपो दरात कपात, आता गृहकर्ज कमी होण्याची शक्यता

बँकेच्या शेअर्समध्ये जास्त घसरण

बँक शेअर्समध्ये जास्त घसरण झालीय. पीएसयू बँक इंडेक्स 4.5 टक्के तुटलाय. बँक निफ्टीत 650 अंकांची घसरण झालीय. निफ्टीवर आयटी सोडून सर्व इंडेक्समध्ये घसरण आलीय.

DHFLकडे बाॅण्डचं व्याज देण्यासाठी पैसे नाहीत

DHFL दिवान हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये 18.3 टक्के घसरण होऊन ते 91.30 रुपयांवर आलेत. गेल्या 5 वर्षांतला हा सर्वात खालचा स्तर आहे. CAREनं DHFL चं रेटिंग BBB- वरून D केलंय.

VIDEO : उद्धव ठाकरेंनी मानले अदृश्य हातांचे आभार, या आणि इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2019 04:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading