Home /News /money /

'हे' तीन शेअर्स शॉर्ट टर्ममध्ये देतील 10 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न, पोर्टफोलिओमध्ये करा समाविष्ट

'हे' तीन शेअर्स शॉर्ट टर्ममध्ये देतील 10 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न, पोर्टफोलिओमध्ये करा समाविष्ट

गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त परतावा देणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला असून, अल्पावधीत 10 टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकणाऱ्या तीन शेअर्सची शिफारस केली आहे. कोणते आहेत हे शेअर्स जाणून घेऊ या

नवी दिल्ली, 28 जानेवारी: आठवडाभराहून अधिक काळ सातत्याने घसरणीचा सामना करणाऱ्या शेअर बाजाराने (Share Market Latest Update) गुरुवारी गुंतवणूकदारांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. अमेरिकी फेडरल बँकेनं बुधवारी महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्याजदर वाढवण्याचे संकेत दिल्यानं तसंच रशिया आणि युक्रेनमधील राजकीय तणावामुळे जगभरातील शेअर बाजारात गुरुवारी मोठी घसरण झाली. भारतीय शेअर बाजाराचे दोन्ही प्रमुख निर्देशांक म्हणजे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही (Nifty) चांगलेच गडगडले. त्यामुळे चिंतेत पडलेल्या गुंतवणूकदारांना शुक्रवारी सप्ताहाच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी मात्र निर्देशांकांनी जोरदार झेप घेत दिलासा दिला. आज (28 जानेवारी 22) सकाळी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्सनं 500 अंकांची तर निफ्टीनं 100 हून अधिक अंकांची झेप घेतली आणि गुंतवणूकदारांमध्ये आनंदाची लहर पसरली. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त परतावा देणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला असून, अल्पावधीत 10 टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकणाऱ्या तीन शेअर्सची शिफारस केली आहे. कोणते आहेत हे शेअर्स जाणून घेऊ या ... हे वाचा-नोकरी सोडा अन् सुरू करा 'हा' व्यवसाय,महिन्याला कमवाल 5 लाख रुपये, जाणून घ्या कसे अ‍ॅक्सिस बँक 21 टक्के परतावा देण्याची शक्यता अ‍ॅक्सिस बँकेचा (Axis Bank Share Price) शेअर गेल्या 200 दिवसांपासून 737 रुपयांच्या वरच्या पातळीवर व्यवहार करत आहे. साप्ताहिक चार्ट पाहिला तर, हायर टॉप हायर बॉटम पॅटर्न दिसत आहे. तुम्ही 773.85 रुपयांच्या पातळीवर खरेदी केल्यास पुढील काही दिवसांत 867-893 रुपयांचं लक्ष्य गाठता येईल. ही किंमत गाठल्यास या शेअरमधून मिळणारा परतावा 21 टक्के असेल. घसरण झाली तरी शेअरचा भाव 705 रुपयांच्या खाली जाण्याची शक्यता नाही. मारुती सुझुकीकडून 13 टक्के परतावा अपेक्षित मारुती सुझुकीचा (Maruti Suzuki Share Price) शेअर सध्या अनेक वर्षांच्या उच्चांकावर व्यवहार करत असून, मध्यम ते दीर्घकालासाठी वाढीचा कल दर्शवत आहे. हा शेअर 9,500 रुपयांपर्यंत सहज पोहोचण्याची शक्यता असून, 8 हजार 820.20 रुपयांच्या पातळीवर हा शेअर खरेदी केल्यास चांगला नफा मिळेल. 9,500 रुपयांच्या पातळीला स्पर्श केल्यानंतर, यात आणखी वाढ होण्याची शक्यता असून तो 9,950 रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. या पातळीवर गुंतवणूकदाराला होणारा नफा 13 टक्के असेल. घसरण झाली तरी हा शेअर 8,350 रुपयांच्या खाली जाणार नाही. हे वाचा-Nykaa च्या शेअरमध्ये महिनाभरात 24 टक्क्यांची घसरण, आता गुंतवणूक करावी का? स्टेट बँकेचा शेअर 10 टक्के नफा देऊ शकतो स्टेट बँकेचा (State Bank of India Share Price) शेअर सध्या त्याच्या सर्वांत उच्च पातळीवर आहे. गुंतवणुकदारांनी 528.95 रुपयांच्या किंमतीला देखील तो विकत घेतला तरी नजीकच्या काळात तो 580 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. या पातळीवर गुंतवणूकदारांना 10 टक्के इतका मोठा परतावा मिळू शकतो. यात घसरण झाली तरी भाव 501 पेक्षा कमी होणार नाहीत. (Disclaimer:बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. News18Lokmat.com कोणालाही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही.)
First published:

Tags: Share market

पुढील बातम्या