मुंबई, 13 मार्च : कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभरात थैमान घातलं आहे. व्यवसायाबरोबरच शेअर मार्केटवरही (Share Market) मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय शेअर मार्केटवरही मोठा परिणाम झाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सुरूवातीच्या कारभारात सेन्सेक्स 3100 अंकांनी घसरला होता. एवढ्या मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजार 45 मिनीटांसाठी ठप्प होता. दरम्यान आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स 1,325.34 अंकांनी वधारला असून, 34103.48 वर मार्केट बंद झालं. तर निफ्टी 433.55 अंकांनी वाढून 10023.70 वर बंद झाला आहे.
(हे वाचा-987 रुपयांत मुंबईहून लेह आणि औरंगाबादला करा प्रवास, ही एअरलाइन देतेय खास ऑफर)
बंद होताना मार्केट वधारलं असली तरी आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी ब्लॅक फ्रायडे ठरला. 3100 हून जास्त अंकांनी घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचं जवळपास 12 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय. निर्देशांक 30 हजारांच्या खाली गेल्यानं शेअर मार्केटला सर्किट लागल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर निर्देशांक नियंत्रणाबाहेर गेल्याने शेअर बाजारातील ट्रेडिंग (Trading) थांबविण्यात आलं होतं. काल सेन्सेक्स तब्बल 2500 अंकांनी आणि निफ्टी (Nifty) तब्बल 700 अंकानी घसला होता.
(हे वाचा-केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता वाढणार, सरकारचा मोठा निर्णय)
एसकोर्ट सिक्योरिटीचे रिसर्च हेड आसिफ इकबाल यांनी न्यूज18 हिंदीशी बोलताना सांगितलं की, अमेरिकन शेअर बाजारातील निर्देशांक Dow Futures गुरूवारी कोसळला होता, मात्र शुक्रवारी त्याची खरेदी वाढली आहे. डाओ फ्यूचर्स 455 अंकांनी वाढून 21,560 वर पोहोचला आहे. गुरुवार रात्री अमेरिकेबरोबरच जगभरातील सर्व शेअर मार्केटमध्ये 1987 नंतरची सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली. याचाच परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील पाहायला मिळत आहे. आसिफ यांच्या म्हणण्यानुसार शेअर मार्केट पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार लवकरच मोठी पावलं उचलण्याची शक्यता आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.