Home /News /money /

महत्त्वाची बातमी! Share Market मध्ये पैसे गुंतवत असाल तर 'या' चुका कधीच करू नका; अन्यथा पैसे जातील पाण्यात

महत्त्वाची बातमी! Share Market मध्ये पैसे गुंतवत असाल तर 'या' चुका कधीच करू नका; अन्यथा पैसे जातील पाण्यात

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताना आपल्या हातून बऱ्याच चुका (Common mistakes while investing money) होतात यामुळे प्रचंड नुकसान सहन करावं लागतं.

    मुंबई, 06 सप्टेंबर: आजकाल Share Market मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांचं (Investing in Share market) प्रमाण प्रचंड वाढलं आहे. कमी पैसे गुंतवून अधिक नफा मिळवण्यासाठी अगदी तरुणांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वजण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत (Share Market Investment Tips) आहेत. मात्र अनेकदा काही लोकांच्या सांगण्यामुळे आपण पैसे गुंतवतो (Do’s and Don’ts of Stock Market Investing) आणि त्याचा फायदा आपल्या मिळू शकत नाही. आपले संपूर्ण पैसे पाण्यात जातात. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताना आपल्या हातून बऱ्याच चुका (Common mistakes while investing money) होतात यामुळे प्रचंड नुकसान सहन करावं लागतं. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच चुका आणि उपाय सांगणार (How to avoid mistakes while Investing Money in share market) आहोत. चला तर मग जाणून घेऊया. माहिती नसूनही पैसे गुंतवणे बरेचदा आपण शेअर मार्केटबद्दल (Share market Investment tips) काहीच माहिती नसतानाही पॅसीए गुंतवतो आणि ते शेअर्स खाली आलेत की आपलं प्रचंड नुकसान होतं. त्यामुळे कधीच संपूर्ण शेअर मार्केट शिकल्याशिवाय पैसे गुंतवू नका. मार्केट शिकण्यासाठी इंटरनेटवर बरीच मोफत माहिती उपलब्ध आहे. शिवाय जर तुम्हाला सुरवात करायची असेल तर तुम्ही काही चांगल्या ऑनलाईन शेअर मार्केट गुंतवणूक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकता. यामुळे तुम्हाला गुंतवणूक नक्की कुठे करायची याबाबत माहिती मिळू शकेल. सुरुवातीला खूप पैसे गुंतवू नका जर तुम्ही गुंतवणुकीला आताच सुरुवात केली असेल तर खूप अधिक पैसे गुंतवू नका. यामध्ये धोका असू शकतो. म्हणूनच सुइरुवातील थोडे पैसे गुंतवा. एकदा तुम्हाला अनुभव आल आणि तुम्हाला नफा मिळण्यास सुरुवात झाली ही हळूहळू पैसे वाढवा. हे वाचा - दररोज फक्त 70 रुपये गुंतवून काही वर्षांतच बना लखपती; पोस्ट ऑफिसची बचत योजना फेक कॉल्सवर विश्वास ठेऊ नका ज्या क्षणी तुम्ही तुमचं ट्रेडिंग अकाउंट (Trading Account) उघडता तेव्हा तुम्हाला तुमच्या फोनवर BUY/SELL कॉलसह मोफत मेसेज मिळू लागतील. पण लक्षात ठेवा कुठे काही मोफत मिळत नाही. मग मल्टी-बॅगर स्टॉकसाठी कोणी अनोळखी विनामूल्य टिप्स का पाठवेल? तुम्हाला मिळालेल्या मोफत टिप्स किंवा शिफारशींवर आंधळेपणाने गुंतवणूक करू नका यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. अतिअपेक्षा ठेऊ नका शेअर मार्केट हे क्षणाक्षणाला बदलणारं मार्केट आहे. त्यामुळे इथे गुंतवणूक केली आणि लगेच तुम्हाला अफाट नफा मिळाला असं कधीच होत नाही. त्यामुळे थोडी गुंतवणूक करून थोडा धीर धरा. इतर अनुभवी लोकांकडून मार्केटच्या काही ट्रेंड्सबद्दल जाणून घ्या. सुरुवातीला थोडाफार नफा मिळवून त्यानंतर जास्त नफा मिळवण्यासाठी सज्ज व्हा. जोखीम पत्करू नका जास्त परतावा मिळवण्यापेक्षा तुमच्या पैशांचं रक्षण करणं महत्वाचं आहे. शेअर्समध्ये गुंतवणूक करताना तुम्ही कधीही अनावश्यक जोखीम घेऊ नका. तसंच तुमचं ‘रिस्क-रिवॉर्ड’ नेहमी संतुलित असेल याची काळजी घ्या.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Money, Savings and investments, Share market, Small investment business

    पुढील बातम्या