Home /News /money /

बंपर रिटर्न! 22 रुपयांचा हा शेअर ₹10 हजारांपार, 25 हजारांच्या गुंतवणुकीचे झाले 1.14 कोटी

बंपर रिटर्न! 22 रुपयांचा हा शेअर ₹10 हजारांपार, 25 हजारांच्या गुंतवणुकीचे झाले 1.14 कोटी

शेअर बाजारात नुसती गुंतवणूक करणं ही जोखीम निश्चितच आहे; पण अभ्यासपूर्ण गुंतवणूक नक्कीच फायदा देते. ही बाब नुकतीच एका पेनी स्टॉकने (Penny Stock) सिद्ध केली आहे. भारत रसायन (Bharat Rasayan) या कंपनीच्या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर: शेअर बाजार (Share Market Investment) ही अशी गोष्ट आहे की प्रत्येक माणसाला त्याबद्दल आकर्षण असतं; पण त्या आकर्षणाचं रूपांतर शेअर बाजारातल्या गुंतवणुकीत करणाऱ्या व्यक्ती फार थोड्या असतात. शेअर बाजार कोसळला, तरी त्याची बातमी होते आणि शेअर बाजार उसळला, तरी त्याची बातमी होते. सर्वांना त्याचं आकर्षण असण्यामागचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणं म्हणजे हमखास नुकसान असं मानणारा एक वर्ग असतो. प्रत्यक्षात मात्र तसं नाही. शेअर बाजारात नुसती गुंतवणूक करणं ही जोखीम निश्चितच आहे; पण अभ्यासपूर्ण गुंतवणूक नक्कीच फायदा देते. ही बाब नुकतीच एका पेनी स्टॉकने (Penny Stock) सिद्ध केली आहे. अगदी किरकोळ किमतीच्या शेअरला पेनी स्टॉक असं म्हटलं जातं. भारत रसायन (Bharat Rasayan) या कंपनीच्या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. वीस वर्षांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवणूक केलेल्यांना तब्बल 40 हजार टक्क्यांहून अधिक रिटर्न्स मिळाले आहेत. हे वाचा-EPS-95 अंतर्गत अनाथ मुलांनाही पेन्शन, किती वयापर्यंत मिळत राहणार ही रक्कम? भारत रसायन लिमिटेड (Bharat Rasayan Limited) या कंपनीचं मार्केट कॅप 4287 कोटी रुपये एवढं आहे. गेल्या 10 वर्षांत या कंपनीच्या शेअरचं मूल्य वार्षिक 56.5 टक्के CAGR च्या हिशेबाने, तर गेल्या 5 वर्षांत शेअरचं मूल्य 42.6 टक्के CAGR च्या हिशेबाने वाढलं आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात गेल्या 52 आठवड्यांतली या शेअरच्या किमतीची (Stock Price High) सर्वोच्च पातळी 15,131.70 रुपये एवढी होती. तसंच याच कालावधीतली नीचांकी पातळी 8619.95 रुपये एवढी होती. गेल्या एका वर्षात या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 15 टक्क्यांपेक्षा जास्त दराने रिटर्न्स दिले आहेत. सध्याच्या काळात हे रिटर्न्स कोणत्याही गुंतवणूक योजनेपेक्षा जास्त आहेत. हे वाचा-नोकरी सोडल्यानंतर PFचे पैसे काढायचे? नाही काढल्यास नुकसान होणार का, वाचा सविस्तर काय आहे या शेअरची प्राइस हिस्ट्री? 12 नोव्हेंबर 2001 रोजी भारत रसायन लिमिटेड या कंपनीचा शेअर राष्ट्रीय शेअर बाजारात (National Stock Exchange) 22 रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता. 15 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रीय शेअर बाजारात या शेअरचं मूल्य तब्बल 10 हजार 100 रुपये एवढं होतं. म्हणजे याचाच अर्थ असा, की 12 नोव्हेंबर 2001 रोजी कोणी या शेअरमध्ये 25 हजार रुपये गुंतवले असते, तर आज त्याचं मूल्य तब्बल 1.14 कोटी रुपये एवढं झालं असतं. तसंच, 2001मध्ये ज्यांनी एक लाख रुपये या शेअरमध्ये गुंतवले असतील, त्या पैशांचं मूल्य आज तब्बल 4.5 कोटी रुपये झालं असतं.
First published:

Tags: Share market

पुढील बातम्या