मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Apple आणि Facebook चे कसे घेता येतात शेअर्स? विदेशी स्टॉकमध्ये कसे गुंतवायचे पैसे

Apple आणि Facebook चे कसे घेता येतात शेअर्स? विदेशी स्टॉकमध्ये कसे गुंतवायचे पैसे

भारतीय गुंतवणूकदार परदेशातील स्टॉकमध्ये पैसे गुंतवण्यात जास्त रस दाखवत आहेत. २०२२ या आर्थिक वर्षात भारतीय गुंतवणूकदारांनी ७४.७ कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

भारतीय गुंतवणूकदार परदेशातील स्टॉकमध्ये पैसे गुंतवण्यात जास्त रस दाखवत आहेत. २०२२ या आर्थिक वर्षात भारतीय गुंतवणूकदारांनी ७४.७ कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

भारतीय गुंतवणूकदार परदेशातील स्टॉकमध्ये पैसे गुंतवण्यात जास्त रस दाखवत आहेत. २०२२ या आर्थिक वर्षात भारतीय गुंतवणूकदारांनी ७४.७ कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : भारतीय गुंतवणूकदार परदेशातील स्टॉकमध्ये पैसे गुंतवण्यात जास्त रस दाखवत आहेत. २०२२ या आर्थिक वर्षात भारतीय गुंतवणूकदारांनी ७४.७ कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. यावरून भारतीय गुंतवणूकदारांचा परदेशी शेअर्सकडे कल वाढत असल्याचे दिसून येते. परदेशी शेअर्स अनेक प्रकारे खरेदी आणि विक्री करता येतात. भारतीय थेट परदेशी स्टॉक एक्सचेंजमध्येही गुंतवणूक करू शकतात. पण त्यासाठी काही गोष्टी तुम्हालाही माहिती असणं गरजेचं आहे.

मनी कंट्रोलच्या एका अहवालानुसार स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा म्युच्युअल फंडमध्ये जास्त स्वरस्य आहे. म्युच्युअल फंडांद्वारे परदेशी शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा फायदा असा आहे की पोर्टफोलिओ व्यावसायिकाद्वारे व्यवस्थापित केला जातो. यामध्ये लहान रक्कम आणि SIP द्वारे देखील गुंतवणूक करता येते.

तुम्ही परदेशी स्टॉकमध्ये देखील थेट गुंतवणूक करू शकता. विनवेस्टा (Winvesta), स्टॉककल (Stockcal), वेस्टेड फायनन्स (Vested Finance) किंवा फिनटेक सारख्या कंपन्या हे काम करतात. काही भारतीय ब्रोकर्स किंवा एजंट यांच्याशी जोडलेले असतात. त्यांच्यामार्फतही तुम्ही गुंतवणूक करू शकता. आंतरराष्ट्रीय स्तरावर India INX आणि NSE IFSC ही संस्था NSE किंवा BSE सारखं काम करते. ही संस्था काही ब्रोकर्सशी करार करते.

हे वाचा-Stock Market : बापरे! फक्त 2 रुपयांच्या शेअरनं गुंतवणूकदारांना बनवलं लखपती

इंडिया INX वर व्यापार करणे हे Fintech अॅपवर व्यापार करण्यासारखेच आहे. त्याचप्रमाणे NSE IFSE भारतीय गुंतवणूकदारांना यूएस मध्ये लिस्टेड केलेल्या 50 निवडक स्टॉक्सच्या विरूद्ध जारी केलेल्याअनसिक्योर्ड डिपॉजिटरी रिसीट्स (UDR) मध्ये व्यापार करण्याची परवानगी देते.

हे वाचा-स्टॉक मार्केटमध्ये ग्राहकांचे शेअर्स सुरक्षित करण्यासाठी सेबीचं मोठं पाऊल! आता बदलला हा नियम

तुमच्या पोर्टफोलियोनुसार तुम्ही केवळ १० ते ३० टक्के हिस्सा हा ग्लोबल मार्केटमध्ये गुंतवला तर चालतो असं तज्ज्ञ सांगतात. मात्र त्यासाठी तुम्हाला मोठी जोखीम पत्करावी लागते. तुम्ही किती जोखीम पत्करू शकता त्यावर १० टक्क्यांपासून ती रक्कम वाढत जाते. तुमच्या पोर्टफोलियोनुसार ती वेगळी असू शकते. सर्वोत्तम पर्याय म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं राहू शकतं असं तज्ज्ञ म्हणतात.

First published:

Tags: Apple, Business, Facebook, Share market