मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Share Market : शेअर बाजार आज 2 टक्के खाली; उद्याचा दिवस कसा असेल, तज्ज्ञाचं मत काय?

Share Market : शेअर बाजार आज 2 टक्के खाली; उद्याचा दिवस कसा असेल, तज्ज्ञाचं मत काय?

सेन्सेक्स आज 1189.7 अंकांनी किंवा 2.1 टक्क्यांनी घसरून 55,822.01 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 371 अंकांनी किंवा 2.2 टक्क्यांनी घसरून 16,614.20 वर बंद झाला.

सेन्सेक्स आज 1189.7 अंकांनी किंवा 2.1 टक्क्यांनी घसरून 55,822.01 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 371 अंकांनी किंवा 2.2 टक्क्यांनी घसरून 16,614.20 वर बंद झाला.

सेन्सेक्स आज 1189.7 अंकांनी किंवा 2.1 टक्क्यांनी घसरून 55,822.01 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 371 अंकांनी किंवा 2.2 टक्क्यांनी घसरून 16,614.20 वर बंद झाला.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 20 डिसेंबर : शेअर बाजारात (Share Market) आज म्हणजेच 20 डिसेंबर रोजी विक्रीचा दबाव दिसून आला. ओमिक्रॉन वेरिएंट (Omicron Variant) वाढत्या प्रसाराचा फटका गुंतवणूकदारांना (Investors) बसत आहे. त्यामुळेच आज शेअर बाजार 4 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता.

कमकुवत जागतिक संकेतांचाही बाजारावर दबाव आहे. दलाल स्ट्रीटवर आजच्या जोरदार घसरणीत बेंचमार्क निर्देशांक 2 टक्क्यांहून अधिक घसरले. एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. Sensex आज 1189.7 अंकांनी किंवा 2.1 टक्क्यांनी घसरून 55,822.01 वर बंद झाला. दुसरीकडे, Nifty 371 अंकांनी किंवा 2.2 टक्क्यांनी घसरून 16,614.20 वर बंद झाला.

जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे विनोद नायर सांगतात की, गेल्या दोन महिन्यांपासून शेअर बाजारामध्ये कन्सॉलिडेशनचा टप्पा सुरू आहे. FII ची प्रचंड विक्री, जगभरातील मध्यवर्ती बँकांची आर्थिक धोरणे कडक करणे यामुळे बाजारावर दबाव येत आहे. पुढे ते म्हणाले की, आता आम्हाला वाटते की आम्ही घसरलेल्या किमतीच्या दृष्टिकोनातून कन्सॉलिडेशनच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. बाजारातील काही पॉकेट्सचे वॅल्युएशन योग्य पातळीवर पोहोचले आहे. मात्र एकूण बाजार अजूनही थोडा महाग आहे. त्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये बाजारात दबाव निर्माण होऊ शकतो. बाजारातील भविष्यातील रणनीतीबाबत नायर म्हणाले की, दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी चांगल्या दर्जाच्या शेअर्सवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

Mutual Fund मधून पैसे काढताना या गोष्टी लक्षात ठेवा, मेहनतीच्या पैशांचं नुकसान होणार नाही

टेक्निकल व्ह्यू

मोतीलाल ओसवाल फायनान्सचे चंदन तापडिया सांगतात की, आज निफ्टी गॅप डाऊनने उघडला. पण त्यानंतरच्या तीव्र घसरणीने निफ्टीला 16,410 च्या खाली ढकलले. मात्र, त्यानंतरच्या रिकव्हरीमुळे निफ्टी 16,614 वर बंद झाला. तापडिया पुढे म्हणाले की, निफ्टीने डेली स्केलवर बिअरिश कँडल (Bearish Candel) तयार केली आहे आणि गेल्या 6 ट्रेडिंग सत्रांपासून तो लोअर लो करत आहे. जर निफ्टी 16,800 च्या खाली घसरला तर तो 16,400 आणि नंतर 16,200 झोन वर जाताना दिसेल. वरच्या बाजूस, यासाठी 1,7000 च्या झोनमध्ये रजिस्टन्स आहे.

Investment Tips: 29 रुपयांच्या स्टॉकमध्ये कमाईची संधी, तीन महिन्यात 45 टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता

GEPL कॅपिटलचे करण पै म्हणतात की निफ्टी 16,200 किंवा 200 दिवसांच्या SMA कडे वाटचाल करत आहे. या पातळीच्या खाली घसरल्यास तो 15,800 च्या दिशेने जाऊ शकतो. वरच्या बाजूने, निफ्टीसाठी 17,000 च्या स्तरावर रजिस्टन्स दिसून येत आहे.

First published:

Tags: Investment, Money, Share market