मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Share Market Crash : शेअर बाजारात घसरगुंडी! गुंतवणूकदारांचं 10 लाख कोटींचं नुकसान, तज्ज्ञांचं मत काय?

Share Market Crash : शेअर बाजारात घसरगुंडी! गुंतवणूकदारांचं 10 लाख कोटींचं नुकसान, तज्ज्ञांचं मत काय?

BSE सेन्सेक्समध्ये लिस्टेड सर्व शेअर लाल चिन्हावर ट्रेड करत होते. बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. हा शेअर 5.57 टक्क्यांनी घसरून 6517 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. Tata Steel (-5.14%), SBIN (-5.06%), HDFC (- 3.72%), Maruti (-2.15%) यासह सर्व समभाग घसरणीवर व्यवहार करत होते.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 20 डिसेंबर : कोरोनाचा नवीन वेरिएंट ओमिक्रॉनची (Omicron Variant) दहशत जगभर आहे. ओमिक्रॉनचा परिणाम आज शेअर बाजारावरही (Share Market) दिसून आला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. बाजार उघडताच विक्रीचा दबाव दिसून आला आणि बाजार लाल चिन्हावर ट्रेड करू लागला. यासोबतच गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी बाजार घसरणीसह खुला झाला. निफ्टी 16,700 च्या खाली घसरला आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स 1000 अंकांच्या घसरणीसह 56000 च्या खाली ट्रेड करताना दिसला. Cipla, Asian Paints, TCS आणि Powergrid Corp हे निफ्टीमध्ये टॉप गेनर आहेत, तर Tata Motors, IndusInd Bank, BPCL, Bajaj Finserv and SBI टॉप लूजर्स ठरले.

Investment Tips: 29 रुपयांच्या स्टॉकमध्ये कमाईची संधी, तीन महिन्यात 45 टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता

निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये घसरण

शेअर बाजाराचा सेन्सेक्स दुपारी 3.12 टक्क्यांच्या घसरणीनंतर 1778 अंकांनी घसरून 55,256 अंकावर ट्रेड करताना दिसला. सेन्सेक्समध्ये नोंदवलेले सर्व शेअर लाल चिन्हात ट्रेड करत होते. राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक निफ्टी (NIFTY 50) देखील 526 अंकांनी घसरून 16,459 च्या पातळीवर ट्रेड करत आहे.

BSE सेन्सेक्समध्ये लिस्टेड सर्व शेअर लाल चिन्हावर ट्रेड करत होते. बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. हा शेअर 5.57 टक्क्यांनी घसरून 6517 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. Tata Steel (-5.14%), SBIN (-5.06%), HDFC (- 3.72%), Maruti (-2.15%) यासह सर्व समभाग घसरणीवर व्यवहार करत होते.

ओमायक्रॉन आणि ग्लोबल मार्केटचा परिणाम

मार्केट एक्सपर्टच्या मते, जगभरात सुध्या सुरू असलेला ओमायक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळेच गेल्या आठवड्यातही मार्केटमध्ये घसरण पहायला मिळाली होती. यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली स्थितीही भारतीय शेअर बाजाराच्या घसरणीला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे.

Mutual Fund मधून पैसे काढताना या गोष्टी लक्षात ठेवा, मेहनतीच्या पैशांचं नुकसान होणार नाही

तज्ज्ञांचा अंदाज काय?

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरुच आहे. या घसरणीमुळे गुंतवणुकदारांना कोट्यवधींचं नुकसान झालं असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, चिंता करण्याचे कारण नसल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. अशा प्रकारचे मार्केट करेक्शन होतच असतात आणि अशा मार्केट करेक्शन किंवा फॉलमध्ये लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी चांगली संधी असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

First published:

Tags: Investment, Money, Share market