Home /News /money /

आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार हिरव्या रंगात बंद, सेन्सेक्स 106 अंकांनी तर निफ्टीत 54 अंकांची वाढ

आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार हिरव्या रंगात बंद, सेन्सेक्स 106 अंकांनी तर निफ्टीत 54 अंकांची वाढ

शेअर बाजारातील बहुतांश क्षेत्रांमध्ये खरेदी दिसून आली. Auto, Realty आणि Energy हे सर्वाधिक वाढणाऱ्या इंडेक्समध्ये होते. निफ्टी ऑटो (Nifty Auto) 2 टक्क्यांहून अधिक वाढले, तर रिअॅलिटी आणि एनर्जी यांनी अनुक्रमे 1.28% आणि 1.27% वाढ नोंदवली.

पुढे वाचा ...
  मुंबई, 17 जानेवारी : शेअर बाजार (Share Market Update) आज सोमवार 17 जानेवारी रोजी हिरव्या रंगात बंद झाला. परंतु शेअर बाजारात झालेली वाढ फार मोठी नव्हती. Nifty 50 आज 0.25 टक्के म्हणजेच 52.35 अंकांच्या वाढीसह 18310.10 वर बंद झाला. BSE Sensex 0.14 टक्के किंवा 85.88 अंकांनी वाढून 61329.03 वर बंद झाला. निफ्टी बँक इंडेक्स -0.31 टक्के किंवा 117.90 अंकांनी घसरून 38252.50 वर बंद झाला. शेअर बाजारातील बहुतांश क्षेत्रांमध्ये खरेदी दिसून आली. Auto, Realty आणि Energy हे सर्वाधिक वाढणाऱ्या इंडेक्समध्ये होते. निफ्टी ऑटो (Nifty Auto) 2 टक्क्यांहून अधिक वाढले, तर रिअॅलिटी आणि एनर्जी यांनी अनुक्रमे 1.28% आणि 1.27% वाढ नोंदवली. लाल चिन्हावर बंद झालेले इंडेक्स Pharma, Bnak, Finance आणि IT होते. Electric Vehicle संबंधित शेअर तुमचा पोर्टफोलियो चमकवू शकतात, 'या' शेअर्सवर नजर ठेवा सेन्सेक्समधील टॉप शेअर्सवर नजर टाकली तर आज 19 शेअर हिरव्या रंगात बंद झाले आहेत. त्याच वेळी, 11 शेअर लाल चिन्हात बंद झाले. आजच्या व्यवहारात सर्वात जास्त फायदा अल्ट्रा केमिकलच्या शेअर्समध्ये झाला आहे. अल्ट्रा केमिकलचा शेअर 2.75 टक्क्यांच्या वाढीसह 7866 वर बंद झाला.
   निफ्टी 50 चे Top Gainers
  1. हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) 5.13 टक्के
  2. ग्रासिम इंडस्ट्रिज (Grassim Inds.) 3.31 टक्के
  3. टाटा मोटर्स (Tata Motors) 2.98 टक्के
  4. ओएनजीसी (ONGC) 2.96 टक्के
  5. अल्ट्राटेक सिमेंट (Ultratech Cement) 2.74 टक्के
  चहा, कॉफी प्या आणि बिल Cryptocurrency मध्ये भरा; कुठे सुरु झालीय ही सुविधा? निफ्टी 50 चे Top Loosers
  1. एचसीएल टेक्नोलॉजी (HCL Technologies) - 5.77 टक्के
  2. एचडीएफसी बँक (HDFC Bank) -1.43 टक्के
  3. ब्रिटानिया इंडस्ट्रीज (Britannia Ind.) -1.27 टक्के
  4. सिप्ला (Cipla) -1.25 टक्के
  5. अॅक्सिस बँक (Axis Bank Ltd.) -1.23 %
  Published by:Pravin Wakchoure
  First published:

  Tags: Investment, Money, Share market

  पुढील बातम्या