मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SENSEX-NIFTY मध्ये आज घसरण, उद्याचा दिवस कसा असेल? तज्ज्ञ काय सांगतात...

SENSEX-NIFTY मध्ये आज घसरण, उद्याचा दिवस कसा असेल? तज्ज्ञ काय सांगतात...

दिवसअखेर आज शेअर बाजार SENSEX 396.34 अंकांनी म्हणजेच 0.65 टक्क्यांच्या घसरणीसह 60,322.37 अंकावर बंद झाला. तर दुसरीकडे, NIFTY 110.25 अंकांनी म्हणजेच 0.61 टक्क्यांनी घसरून 17,999.20 वर बंद झाला.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 16 नोव्हेंबर : शेअर बाजारात (Share Market) आज म्हणजेच 16 नोव्हेंबर रोजी चढ उतार पाहायला मिळालेस अस्थिरतेत शेअर बाजार आज लाल रंगात बंद झाला. Banking, Metal, Pharma आणि Oil and Gas शेअर्सनी बाजारावर दबाव आणला. तर IT, Auto शेअर्सला थोडा सपोर्ट मिळाला.

दिवसअखेर आज शेअर बाजार SENSEX 396.34 अंकांनी म्हणजेच 0.65 टक्क्यांच्या घसरणीसह 60,322.37 अंकावर बंद झाला. तर दुसरीकडे, NIFTY 110.25 अंकांनी म्हणजेच 0.61 टक्क्यांनी घसरून 17,999.20 वर बंद झाला. बाजाराची सुरुवात आज निगेटिव्ह. दुपारच्या सेशनमध्ये काही प्रमाणात रिकव्हरी दिसून आली पण लगेच प्रॉफिट बुकिंगमुळे अखेर बाजार घसरणीसह बंद झाला.

Motilal Oswal चे चंदन तापडिया म्हणतात की निफ्टीने आज बियरिश कँडल तयार केली आणि गेल्या 2 ट्रेडिंग सेशनमधील हायर हाय, हायर लो नाकारली. आता 18200 आणि 18350 च्या झोनमध्ये जाण्यासाठी निफ्टीला 18000 च्या वर रहावे लागेल. डाउनसाईड वर सपोर्ट 17900-17777 च्या पातळीवर दिसत आहे.

PM KISAN मध्येही होतोय घोटाळा! 'या' शेतकऱ्यांकडून सरकार वसूल करणार पैसे

रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणतात की मिश्र जागतिक संकेतांमुळे बाजारातील शेअरहोल्डर चिंतेत आहेत आणि नजीकच्या भविष्यातही हा कल कायम राहण्याची अपेक्षा आहे. जर आपण वेगवेगळ्या क्षेत्रांवर नजर टाकली तर, बँकिंग क्षेत्रातील सततच्या कमकुवतपणामुळे सेन्सेक्स निफ्टीवर दबाव पडत आहे. तर इतर क्षेत्रे अधिक तोट्यापासून बाजाराचे संरक्षण करताना दिसतात. सध्याच्या परिस्थितीत, आपली स्थिती हलकी ठेवणे आणि बाजाराची दिशा स्पष्ट होण्याची प्रतीक्षा करणे चांगले होईल.

Digital Gold बाबत मोठ्या निर्णयाच्या विचारात सरकार, SEBI आणि RBI आखत आहेत योजना

चॉईस ब्रोकिंगचे पलक कोठारी सांगतात की, तांत्रिकदृष्ट्या निर्देशांकाने डेली टाईम फ्रेमवर बियरिश कँडल तयार केली आहे, जी निफ्टीमध्ये कमजोरी दर्शवत आहे. Hour Chart वर, निफ्टी लोअर हाय आणि लोअर लो पातळीवर ट्रेड करत आहे, जे येत्या सत्रात आणखी काही सुधारणा दर्शवते. निफ्टीला 17800 लेव्हलवर सपोमर्ट आहे तर 18250 लेव्हलवर रजिस्टन्स दिसत आहे.

First published:

Tags: Money, Share market