शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना दिलासा, हा चार्ज होणार रद्द

शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना दिलासा, हा चार्ज होणार रद्द

शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा निर्णय फायद्याचा ठरणार आहे. परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठीही या निर्णयामुळे मदत होईल. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत 72 रुपये झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : मोदी सरकारने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या.

FPI म्हणजेच फॉरीन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स या नात्याने गुंतवणूक करणाऱ्या परकीय गुंतवणूकदारांना सरचार्जमधून सूट देण्यात आली आहे.  सरचार्जमुळे परदेशी गुंतवणूकदारांना भारतातली गुंतवणूक फायद्याची वाटत नव्हती. त्यामुळे ते शेअर बाजार आणि बाँड मार्केटमधले पैसे काढून घेत होते. सरकारने आता हा सरचार्ज रद्द केला आहे.

शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा निर्णय फायद्याचा ठरणार आहे. परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठीही या निर्णयामुळे मदत होईल. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत 72 रुपये झाली आहे.

होमलोन आणि कारलोन होणार स्वस्त, निर्मला सीतारामन यांची घोषणा

अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल त्यांनी एक सादरीकरण केलं. भारताची अर्थव्यवस्था जगाच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहे, असं त्या म्हणाल्या.

चीन, अमेरिका, जर्मनी, यूके, फ्रान्स, कॅनडा, इटली, जपान यांच्य तुलनेत भारताच्या GDP च्या वाढीचा दर जास्त आहे, असं त्यांनी सांगितलं. बँकांसाठी सरकार 70 हजार कोटींचा निधी देणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली.

होमलोन आणि कारसाठीचं कर्ज घेणं आता सोपं होणार आहे. रेपो रेटनुार हे कर्ज स्वस्त करण्याला बँकांनी मंजुरी दिली आहे, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. कर्ज मंजूर झालं आहे की नाही याबद्दल ग्राहक ऑनलाइन पडताळणी करू शकतात, असं त्या म्हणाल्या.

कार उद्यागोबद्दल निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाची घोषणा केली. BS 4 गाड्या बंद होणार नाहीत, मार्च 2020 पर्यंत या गाड्या सुरूच राहतील, असं त्यांनी सांगितलं.

===================================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 06:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading