20व्या वर्षी शंकर कमवतोय वर्षाला 20 कोटी, 'हे' आहे यशाचं रहस्य

20व्या वर्षी शंकर कमवतोय वर्षाला 20 कोटी, 'हे' आहे यशाचं रहस्य

Shankar, Telangana, Startup - तेलंगणाचा 20 वर्षाचा शंकर आज वर्षाला 20 कोटी कमावतोय. कसा झाला तो इतका यशस्वी? वाचा त्याची यशोगाथा

  • Share this:

हैद्राबाद, 10 जुलै : साधारण 20व्या वर्षी मुलगे काय करतात? मित्रमैत्रिणींबरोबर धमाल करणं, आयुष्य एंजाॅय करणं असं सुरू असतं. पण तेलंगणाचा शंकर चंदा हा वेगळाच आहे. त्यानं त्याचा उद्योगधंदा सुरू केला. स्टार्टअप सुरू करून आज तो वर्षाला 20 कोटी कमावतोय.शंकर 16 वर्षांचा असताना त्यानं गुंतवणूक कशी करायची, याचे सल्ले देणं सुरू केलं. 17व्या वर्षी त्यानं त्याचं पहिलं पुस्तक प्रसिध्द केलं फिनॅन्शियल निर्वाण ( Financial Nirvana).

शंकरनं नाॅएडाला बेनेट युनिव्हर्सिटीत बीटेकला प्रवेश घेतला. युनिव्हर्सिटीतले अध्यक्ष अजय बात्रा यांनी त्याला नवा उद्योग सुरू करायचं प्रोत्साहन दिलं. शंकरनं अनेक गुंतवणुकीतून मिळवलेले पैसे सवर्त उभारण्यासाठी गुंतवले. यामुळे युके, युएस, डेन्मार्क आणि भारत इथून गुंतवणुकीचे धडे घेतले.

मोदी सरकारचा मोठा निर्णय, महिला कर्मचाऱ्यांना मिळणार 'ही' सुविधा

दिवाळीच्या सुट्टीत ट्रेनचं कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी हे करा

शंकरनं अनेक वेबसाइटसाठी आर्थिक सल्लागार म्हणून काम केलं. अनेक बाजारांचा अभ्यास करण्यात त्याला उत्साह असायचा. याच उत्साहामुळे जनतेसाठी काही करावं याचा विचार तो करू लागला. अनेक मित्र, कुटुंबीय त्याला पैसे कसे गुंतवायचे याबद्दल विचारू लागले होते. पण त्यांना मार्गदर्शन करावं की नाही हा संभ्रम त्याला होता. कारण त्यात तोटा झाला तर तो जबाबदार असणार होता.

दरम्यान, त्यानं 1 हजार लोकांचा सर्वे केला. त्यात लोकांचं आर्थिक आयुष्य समजून घेतलं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अनेकांची प्राथमिकता पैसे आहे. मग गुंतवणूक करून लोकांना श्रीमंत करायची कल्पना त्याला सुचली. थोड्या प्रमाणात का होईना, असं सुरू करावं असं त्याला वाटलं.

आम्ही जेव्हा त्याचा उद्योग सुरू करणाऱ्यांसाठी सल्ला विचारला, तेव्हा तो म्हणाला, 'तुमचा विचार स्पष्ट असेल तर तुम्ही तुमचं ध्येय नक्की गाठू शकता. फक्त तुम्ही जे करता त्यावर विश्वास ठेवावा लागेल.

या लेकरांची कहाणी डोळ्यात पाणी आणणारी, यांना मिळेल का आईचे छत्र?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2019 09:08 PM IST

ताज्या बातम्या