Home /News /money /

LIC CSL ने लाँच केलं 'शगुन' गिफ्ट कार्ड, 10000 रुपयांपर्यंत करता येईल शॉपिंग, वाचा सविस्तर

LIC CSL ने लाँच केलं 'शगुन' गिफ्ट कार्ड, 10000 रुपयांपर्यंत करता येईल शॉपिंग, वाचा सविस्तर

LIC Gift Card Shagun: या कार्डच्या माध्यमातून 500 रुपयापासून 10000 रुपयांपर्यंत कोणतीही रकमेचं गिफ्ट देता येईल

    नवी दिल्ली, 16 जून: एलआयसी कार्ड्स सर्व्हिसेस लिमिटेड  (LIC CSL) ने रुपे प्लेटफॉर्म (Rupay) वर आयडीबीआय बँकेच्या (IDBI Bank) सहयोगाने एक कॉन्टॅक्टलेस प्रीपेड गिफ्ट कार्ड लाँच केलं आहे. 'शगुन' असं हे कार्ड लाँच करण्यात आलं आहे. LIC CSL ने एका अधिकृत वक्तव्यामध्ये असं म्हटलं आहे की कॅशलेस व्यहारांना (Cashless) प्रोत्साहन देणं हे कार्ड लाँच करण्यामागचं उद्दिष्ट्य आहे. या कार्डच्या माध्यमातून 500 रुपयापासून 10000 रुपयांपर्यंत कोणत्याही रकमेचं गिफ्ट देता येईल. शिवाय शॉपिंगसाठी या कार्डचा वापर करता येईल. या कार्डअंतर्गत ग्राहकाला तीन वर्षांची वैधता मिळते आणि त्याअंतर्गत ग्राहकांना व्यवहार करता येतात. तुम्ही एका पेक्षा अधिक ट्रान्झॅक्शन करू शकता. या कार्डचा वापर ऑनलाइन खरेदीसह बिल पेमेंटसाठी करता येईल. वाचा या कार्डबाबत शगुन कार्ड सुरुवातीच्या टप्प्यामध्ये एलआयसी आणि त्यांच्या सहाय्यक कंपन्यांसाठी अधिकृत वापरासाठी उपलब्ध असे. हे कार्ड अधिकृत संमेलनं आणि कार्यक्रमांमध्ये विशेष बक्षिसांच्या सुविधेसाठी वापरलं जाईल. नंतर हे डिजिटल व्यासपीठाद्वारे इतर वापरासाठी देखील वापरले जाईल. हे वाचा-आरोग्य क्षेत्रासाठी मोदी सरकार देणार 50000 कोटी, वाचा काय आहे पूर्ण योजना इथे वापरता येईल कार्ड Shagun Gift Card चा वापर भारतात कोट्यवधी व्यापारी आणि ई-कॉमर्स वेबसाइटवर कार्डवरील खर्च पर्यायांमध्ये विविधता आणण्यासाठी केला जाऊ शकतो. या कार्डमुळे वापरकर्त्यांना विभागीय स्टोअर्स, पेट्रोल पंप, रेस्टॉरंट्स, ज्वेलरी स्टोअर्स, कपड्यांची दुकानं इत्यादी विविध व्यापारी ठिकाणी खरेदी करण्याचे स्वातंत्र्य मिळेल, असे कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे. हे वाचा-SBI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! कोरोनाशी लढण्यासाठी बँक देतंय 'Kavach' योजना ते विविध मोबाइल वॉलेट्स आणि ई-कॉमर्स पोर्टल किंवा अ‍ॅप्सद्वारे ऑनलाइन खरेदी करण्यासाठी, युटिलिटी बिलं भरण्यासाठी, हवाई, रेल्वे, बस इत्यादी तिकिट बुक करण्यासाठी हे कार्ड वापरू शकतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: LIC

    पुढील बातम्या